Did Suresh Raina Unfollowed CSK On Twitter? सुरेश रैनाने ट्विटरवर चेन्नई सुपर किंग्जला केले अनफोलो? सोशल मीडियावर फेक न्यूजने चर्चेला उधाण
सुरेश रैना (Photo Credits: IPLT20.com)

टीम इंडियाचा माजी क्रिकेटर सुरेश रैना (Suresh Raina) याच्या निवृत्तीच्या बातमीने त्याच्या असंख्य चाहत्यांना धक्काच बसला. भारतीय संघाचा वर्ल्ड कप विजेता कर्णधार महेंद्र सिंह धोनीने (M S Dhoni) 15 ऑगस्ट रोजी निवृत्ती जाहीर केल्यानंतर त्याचा सहकारी आणि चिन्ना थाला म्हणून प्रसिद्ध असलेल्या सुरेश रैनाने (Suresh Raina) देखील आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून एक्सिट घेतली. त्यात मध्ये तो भारतात परत आल्यानंतर IPL खेळेल असे अनेकांना वाटले होते. मात्र तसे काही झाले नाही. त्यामुळे अनेक दिवसांपासून रैनाने IPL मध्ये परत यावे अशी मागणी ट्रेंड करत होती. या सर्वाला कंटाळून सुरेश रैनाने CSK ला Unfollow केल्याच्याही बातम्या येऊ लागल्या.

पण प्रत्यक्षात असे काही घडले नसून सुरेश रैना अजूनही CSK ला फॉ़लो करत असल्याचे सांगितले आहे. चेन्नई सुपर किंग्ज ची IPL मध्ये सलग दुस-यांदा हरल्यानंतर सुरेश रैना पुन्हा टीममध्ये परत यावा अशी मागणी सोशल मिडियावर ट्रेंड होत होती. या सर्वाला कंटाळून सुरेश रैनाने CSK ला ट्विटरवर अनफॉलो केले आहे. मात्र प्रत्यक्षात असे काहीच घडलेले नाही. Suresh Raina Retires: वयाच्या 16व्या वर्षी पदार्पण करणाऱ्या सुरेश रैनाच्या नावावर आजही आहेत 'हे' विक्रम, पाहा चिन्ना थालाच्या कारकिर्दीतील जबरदस्त रेकॉर्ड

याउलट रैनासाठी CSK आजही तितकीच जवळची आहे असे सांगितले आहे. या संदर्भात अधिक माहिती देत 'या क्षणाला रैनाला टीममध्ये परत आणता येणार नाही. आपण त्याच्या निर्णयाचा सन्मान करावा आणि क्रिकेटमध्ये हार-जीत होतच राहते' असे चेन्नई सुपर किंग्जचे सीईओ काशी विश्वनाथन यांनी सांगितले होते.

2005 मध्ये श्रीलंकेविरुद्ध आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करणारा रैना भारताकडून 16 कसोटी, 226 एकदिवसीय आणि 78 टी-20 सामने खेळला आहे. रैनानं आपल्या करिअरची सुरुवात वयाच्या 16व्या वर्षी केली होती. 15 वर्षाच्या क्रिकेट कारकीर्दीत रैनाने बरेच असे डाव खेळले जे अत्यंत रोमांचकारी होते आणि त्याच काळात त्याने काही उत्तम विक्रमही नोंदवले ज्यामुळे तो नेहमीच लक्षात राहील.