विराट कोहलीनंतर आता गौतम गंभीर याच्यानावर नावावर होणार अरुण जेटली स्टेडियममध्ये स्टॅन्ड, DDCA या दिवशी करू शकते अनावरण
गौतम गंभीर (Photo Credit: Getty Images)

टीम इंडियाचा माजी सलामी फलंदाज आणि सध्याचे पूर्व दिल्लीमधून भाजप खासदार गौतम गंभीर (Gautam Gambhir) कोणत्याना कोणत्या कारणाने चर्चेचा विषय बनला होता. अलीकडेच दिल्लीमधील प्रदूषणाबाबतची बैठकीला गैरहजर राहत इंदोरमध्ये पोहे-जलेबी खाण्यासाठी गंभीरला ट्रोल करण्यात आले होते. पण, या सर्वांमध्ये गंभीरच्या चाहत्यांसाठी एक खुश खबर आली आहे. दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियममध्ये आता गंभीरच्या नावावर एक स्टॅन्डचे लवकरच अनावर करण्यात येणार आहे. सभापती रजत शर्मा यांना विरोध करणाऱ्या अ‍ॅपेक्स कौन्सिलच्या नऊ सदस्यांनी गंभीरच्या नावाचे स्टॅन्ड करण्याच्या बातमीची पुष्टी केली आहे. इंडियन एक्स्प्रेसच्या वृत्तानुसार डीडीसीए (DDCA) लवकरच गंभीर स्टॅन्डची योजना अंमलात आणणार आहे. शिवाय, जर गोष्टी जर योजनेनुसार गेल्या तर डीडीसीए पुढील महिन्यात सुरू होणाऱ्या रणजी ट्रॉफी हंगामादरम्यान गंभीर स्टॅन्डचे अनावरण करेल. ('धोनीमुळे विश्वचषक 2011 च्या अंतिम सामन्यात माझे शतक हुकले'- गौतम गंभीर)

“गौतम गंभीर याच्या नावाच्या स्टॅन्डबाबत अ‍ॅपेक्स कौन्सिलने मंजुरी दिली आहे. ते स्टेडियम एन्डच्या जवळ (आंबेडकर फुटबॉल स्टेडियम) आहे. ”डीडीसीएचे सहसचिव राजन मनचंदा म्हणाले. गंभीरला हा सन्मान देण्यापूर्वी महिन्यापूर्वी तयारी करण्यात आली होती. हा सन्मान गंभीरला 22-23 जूनला देण्यात येणार होता, परंतु सदस्यांच्या मतभेदांमुळे ते होऊ शकले नाही आणि ही योजना रखडली गेली.

सध्या भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली याचा दोन महिन्यांपूर्वी भारतीय संघासाठी केलेल्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल गौरव करण्यात आला आहे. स्टेडियमच्या एका स्टँडला विराट कोहली असे नाव देण्यात आले आहे. विशेष म्हणजे कोहलीने गंभीरच्या पाच वर्षानंतर भारतीय संघाकडून पदार्पण केले आणि गंभीरआधी त्याला हा सन्मान देण्यात आला आहे.