DC Beat RR, IPL 2020: दिल्ली कॅपिटल्स संघाचा विजय; राजस्थान रॉयलचा 13 धावांनी पराभव
DD Vs RR (Photo Credit: IPL)

DD vs RR 30th IPL Match 2020: इंडियन प्रिमिअर लीगच्या (IPL 13) तेराव्या हंगामातील 30व्या सामन्यात राजस्थान रॉयल्सच्या विरुद्ध दिल्ली कॅपिटल्सच्या  (Delhi Capitals Vs Rajasthan Royals) संघाने 13 धावांनी विजय मिळवला आहे. या सामन्यात टॉस जिंकून दिल्ली कॅपिटल्सने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. प्रथम फलंदाजी करत दिल्लीच्या संघाने 20 षटकांत 7 बाद 161 धावा केल्या होत्या. या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या राजस्थानच्या संघाला केवळ 148 धावा करता आल्या आहेत.

दिल्लीचा कर्णधार श्रेयस अय्यरने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र, राजस्थानच्या गोलंदाजांनी पहिल्या चेंडूपासून प्रभावी मारा करत दिल्लीसमोर अडचणी निर्माण केल्या. अखेरीस अय्यर-धवनने भागीदारी करत संघाचा डाव सावरला. परंतु, मोक्याच्या क्षणी दोन्ही फलंदाज माघारी परतल्यामुळे दिल्ली 161 धावांपर्यंतच मजल मारु शकला. या सामन्यात राजस्थानकडून जोफ्रा आर्चरने 3, जयदेव उनाडकटने 2 तर कार्तिक त्यागी आणि श्रेयस गोपाळने प्रत्येकी 1-1 विकेट्स घेतला आहे. त्यानंतर दिल्लीच्या संघाने दिलेल्या धावांच्या पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या राजस्थानच्या संघाची सुरुवात अडखळत झाली. जोस बटलर आणि स्टिव्ह स्मिथ लागोपाठ माघारी परतल्यानंतर बेन स्टोक्सने संजू सॅमसनच्या साथीने संघाचा डाव सावरला. परतं,यानंतर संजू सॅमसनही अक्षर पटेलच्या गोलंदाजीवर बाद झाला. त्यानंतर रियान परागही रॉबिन उथप्पासोबत धाव घेण्याच्या गोंधळात धावबाद होऊन माघारी परतला. दरम्यान, मधल्या फळीत रॉबिन उथप्पा आणि राहुल तेवतिया यांनी फटकेबाजी करत सामन्यात रंगत निर्माण केली. परंतु, नॉर्जने उथप्पाचा त्रिफळा उडवत दिल्लीला पुन्हा एक यश मिळवून दिले. हे देखील वाचा-DC Beat RR, IPL 2020: दिल्ली कॅपिटल्स संघाचा विजय; राजस्थान रॉयलचा 13 धावांनी पराभव

आयपीएलचे ट्वीट-

राजस्थान रॉयल संघाविरुद्ध सामन्यात विजय मिळवल्यानंतर दिल्ली कॅपिटल्सच्या संघाने आयपीएलच्या गुणतालिकेत अव्वल स्थानी झेप घेतली आहे. तर, पराभवानंतरही राजस्थानचा संघ सहाव्या स्थानावर कायम आहे. उद्याचा सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळरू विरुद्ध किंग्ज इलेव्हन पंजाब यांच्यात शारजाह स्टेडियमवर रंगणार आहे.