CSK VS LSG, Head to Head: लखनौ सुपर जायंटस् आणि चैन्नई सुपर किग्ज आज आमनेसामने, चैन्नई परभवाचा वचपा काढणार

चैन्नई आणि लखन्नौ दोघांकडेही आठ - आठ अंक असून नेटरनरेटमुळे चैन्नई पुढे आहे.

LSG vs CSK (Photo Credit - X)

गतविजेते चेन्नई सुपर किंग्ज आणि लखनौ सुपर जाययंटस् हे आज पु्न्हा एकदा आमनेसामने येत आहेत. शुक्रवारी झालेल्या सामन्यात चेन्नईला लखनौकडून पराभवाचा सामना करावा लागणार आहे. त्याची परतफेड करण्याची संधी चेन्नईला आज घरच्या मैदानावर मिळणार आहे.  लखनौमध्ये झालेल्या त्या पराभवामुळे चेन्नईची गाडी 8 गुणांवरच थांबली. मात्र लखनौनेही 8 गुण मिळवत गुणांची बरोबरी साधली. गुणतक्त्यात चेन्नई चौथ्या स्थानी असले तरी हे स्थान कायम राखण्यासाठी किंवा पुढे प्रगती करण्यासाठी त्यांना विजय आवश्यक आहे. (Rajasthan Beat Mumbai: राजस्थानचा मुंबईवर 9 विकेटने शानदार विजय, यशस्वी जैस्वालचे 'रॉयल' शतक)

चेन्नई संघात कर्णधार ऋतुराज गायकवाड आणि शिवम दुबे यंदा त्यांच्या फलंदाजीची प्रमुख धुरा वाहत आहेत; परंतु शुक्रवारच्या सामन्यात हे दोघेही लवकर बाद झाले होते. रवींद्र जडेजाने शानदार अर्धशतकी खेळी केली होती. त्यानंतर मोईन अलीच्या 30 आणि धोनीचा 9 चेंडूंतील नाबाद 28 धावांचा झंझावात मोलाचा ठरला होता. चेन्नईची गोलंदाजीही यंदाच्या त्यांच्या प्रवासात चांगले योगदान दिले आहे.

स्पर्धेत प्लेऑफ गाठू शकतील या चार संघात चेन्नई आणि लखनौ यांच्यात चुरस होऊ शकेल. चैन्नई आणि लखन्नौ दोघांकडेही आठ - आठ अंक असून नेटरनरेटमुळे चैन्नई सध्या अंकतालिकेत चौथ्या क्रमांकावर असून लखन्नौ पाचव्या क्रमांकावर आहे. आजचा सामना जो संघ जिंकले तो दहा अकांसह पुढे जाईल.