क्रिडा विश्वाला मोठा धक्का! सरावदरम्यान हृदयविकाराचा झटका आल्याने 'या' युवा क्रिकेटपटूचा मृत्यू
(फोटो सौजन्य-फेसबुक)

Joshua Downie Passes Away: कोरोना विषाणूने संपूर्ण जगात थैमात घातले असताना क्रिडा विश्वातून एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. नॉटिंगहॅमशायरचा युवा क्रिकेटपटू जोशुआ डाउनी याचा सरावदरम्यान हृदयविकाराचा झटका आल्याने मृत्यू झाला आहे. ही अत्यंत वाईट बातमी असून या क्रिकेटपटूच्या निधनाने क्रिडा विश्वाला मोठा धक्का बसला आहे. क्रिकेट हा एक खेळ आहे जो चाहत्यांना उत्साहाने भरुन काढतो. परंतु, क्रिकेट हा जगातील सर्वात धोकादायक खेळांपैकी एक मानला जातो. दरम्यान, क्रिकेटपटूंनी मैदानात असताना आपला जीव गमावल्याची ही पहिली घटना नाही. इतिहासात अशा बर्‍याच घटना घडल्या आहेत.

डाउनी हा ऑलिम्पिक जिम्नॅस्ट बेकी डाउनी आणि एली डाउनी यांचा भाऊ होता. जोशुआ डाउनीला सीपीआर देण्यात आला, मात्र तो वाचू शकला नाही. खाली कोसळल्यानंतर जोशुआला रुग्णालयात नेण्यात आले होते, मात्र त्याला मृत घोषित करण्यात आले. जोशुआ डाऊनीची आई हेलन म्हणाली आहे की, ती आपल्या मुलाला कधीच विसरु शकणार नाही. जोशुआ बेशुद्ध पडल्यानंतर त्याला शुद्ध आलीच नाही. रुग्णवाहिका त्याला रूग्णालयात घेऊन गेली, पण त्याला वाचवता आले नाही. हे देखील वाचा- ICC WTC Final: या 3 किवी खेळाडूंपासून 'विराटसेने'ला राहावे लागणार सावध, फायनलमध्ये ठरू शकतात डोकेदुखी!

नॉटिंगहॅमशायर क्रिकेट बोर्ड प्रीमियर लीगने जोशुआ डाउनी यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. तसेच कठीण काळात जोशुआच्या कुटुंबियांबद्द संवेदना व्यक्त केली आहे. दरम्यान, सर्व क्लबच्या सदस्य आणि खेळाडूंनी 2 मिनिटे शांत उभे राहून त्याला श्रद्धांजली वाहली आहे.