धक्कादायक! न्यूझीलंडमध्ये सामना सुरू असताना भरतीय क्रिकेटपटूचा मैदानावर मृत्यू
प्रतिकात्मक फोटो क्रिकेट (फोटो सौजन्य-फेसबुक)

नुकत्याच झालेल्या भारत (India) विरुद्ध न्यूझीलंड (New Zealand) क्रिकेटच्या पाचव्या एकदिवसीय सामन्यात किविंना त्यांच्याच मायदेशात हरविले आहे. त्यामुळे सर्वत्र आनंदाचे वातावरण असतानाच एक दु:खद घटना घडली आहे.

न्यूझीलंडच्या मैदानावर क्रिकेटचा सामना खेळण्यासाठी उतरेलेल्या भारतीय क्रिकेटपटूची सामन्यादरम्यान मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. हरीश गंगाधरन (Hareesh Gangadharan) असे या मृत क्रिकेटपटूचे नाव आहे. हरीश हा ग्रीन आयलँड क्रिकेट क्लबच्या दुसऱ्या श्रेणीतील संघातून खेळत असे. 33 वर्षीय हरीश डुनेडिन येथील सनीवेल स्पोर्ट्स सेंटर येथे भरवण्यात आलेल्या क्रिकेटच्या सामन्यासाठी जात होता.

त्यावेळी अचानक मैदानावर पाऊल ठेवताच त्याची तब्येत बिघडून त्याला श्वासोच्छवास घेण्यास त्रास होऊ लागला. त्यानंतर मैदानातच या त्रासामुळे हरीश खाली कोसळून पडला. तर गोलंदाजी करताना ही दुर्घटना झाली असल्याचे सांगितले जात आहे. (हेही वाचा- Australia vs Sri Lanka: श्रीलंका फलंदाज करुणारत्ने याला सामना खेळताना गंभीर दुखापत, मानेला चेंडू आदळल्याने स्ट्रेचरवर)

न्यूझीलंडच्या वृत्तपत्रानुसार, गंगाधर ह्याने फक्त दोन ओव्हरच गोलंदाजी केली. तर ग्रीन आयलँडचे मुख्याधिकारी जॉन मोएल यांनी असे सांगितले की, गंगाधरन हा त्यांच्या क्लबमध्ये दुसऱ्या श्रेणीतील संघामध्ये खेळत होता. तर या घटनेबाबत मोएल यांनी दु:ख व्यक्त केले आहे.

रिपोर्ट्सनुसार, गंगाधरन हा संघासाठी फलंदाजी आणि गोलंदाजी करायचा. गंगाधरन याने ग्रीन आयलँडतर्फे 6 सीजन खेळला आहे. तर गेल्या पाच वर्षापूर्वींपासून गंगाधरन न्यूझीलंडमध्ये राहत होता.