क्रिकेट ऑस्ट्रेलियाने महेंद्र सिंह धोनी याला दिला मोठा सन्मान; बनवले ODI Team Of Decade चा कर्णधार, रोहित शर्मा-विराट कोहली ही अंतिम 11 मध्ये
विश्वचषक विजेत्या भारताचा सुपरस्टार एमएस धोनी याला क्रिकेट ऑस्ट्रेलियाने संकलित केलेल्या दशकातल्या वनडे टीमचा कर्णधार म्हणून नियुक्त केले आहे. क्रिकेट ऑस्ट्रेलियाने जाहीर केलेल्या 11 सदस्यीय क्रिकेटपटुंच्या यादीत 3 भारतीय खेळाडूंचा समावेश आहे. क्रिकेट ऑस्ट्रेलियाने दशकाचा टेस्ट संघ जाहीर करून विराटला संघाचा कर्णधार म्हणून नेमले आहे.
विश्वचषक विजेत्या भारताचा सुपरस्टार एमएस धोनी (MS Dhoni) याला क्रिकेट ऑस्ट्रेलियाने (Cricket Australia) संकलित केलेल्या दशकातल्या वनडे (ODI) टीमचा कर्णधार म्हणून नियुक्त केले आहे. क्रिकेट ऑस्ट्रेलियाने जाहीर केलेल्या 11 सदस्यीय क्रिकेटपटुंच्या यादीत 3 भारतीय, ज्यात 2010 च्या काही सर्वोत्तम वनडे खेळाडूंचाही समावेश आहे. 2011 मध्ये भारताला विश्वचषक मिळवून देणारा धोनी सीएच्या वनडे संघात विकेटकीपिंगची जबाबदारीही सांभाळत आहे. धोनीशिवाय भारताचा कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) आणि सलामी फलंदाज रोहित शर्मा (Rohit Sharma) यांनाही दशकाच्या संघात स्थान मिळते. सीएच्या टीममध्ये रोहित दक्षिण आफ्रिकेच्या हशिम अमला याच्याबरोबर डावाची सुरुवात करतोय आणि कोहली नेहमीप्रमाणे तिसर्या क्रमांकावर आहे. क्रिकेट ऑस्ट्रेलियासाठी वर्षातील वनडे संघाचे संकलन करणारे पत्रकार मार्टिन स्मिथ यांनी म्हटले आहे की, भारताच्या मर्यादित षटकांच्या क्रिकेटमधील "सुवर्णकाळ" मध्ये धोनी हा एक वर्चस्वशाली खेळाडू होता. स्मिथने कोहलीलाही दशकाचा "सर्वोत्तम वनडे फलंदाज" म्हणून संबोधित केले. (Year Ender 2019: विराट कोहली-रोहित शर्मा यांची 87 वर्षीय फॅनशी भेट, क्रिस्तियानो रोनाल्डो याच्याकडून लिओनल मेस्सी याला डिनरसाठी विचारणा यांसह अनेक घटनांनी संस्मरणीय ठरले हे 2019 वर्ष)
मागील दशकांच्या तुलनेत कसोटी क्रिकेटसाठी हे सर्वोत्कृष्ट वर्ष राहिले आहे. दशक संपण्याच्या जवळ आल्याने क्रिकेट ऑस्ट्रेलियाने दशकाचा टेस्ट संघ जाहीर करून विराटला संघाचा कर्णधार म्हणून नेमले आहे. अॅलेस्टर कूक (Alastair Cook) आणि डेव्हिड वॉर्नर (David Warner) सलामी फलंदाज असून त्यांच्यापाठोपाठ केन विल्यमसन (Kane Williamson) आणि स्टीव्ह स्मिथ (Steve Smith) यांचा समावेश आहे. कोहली 5 व्या क्रमांकावर. क्रिकेट ऑस्ट्रेलियाने निवडलेला हा सर्वात मजबूत मध्यम क्रम आहे. विराटनंतर एबी डिव्हिलियर्स याचा नंबर लागतो आणि त्याच्यापाठोपाठ इंग्लंडचा अष्टपैलू बेन स्टोक्स असेल. त्याच्या अष्टपैलू कारकिर्दींमुळे संघात अधिक संतुलन वाढेल आणि तो कदाचित त्या दशकाचा सर्वोत्कृष्ट अष्टपैलूही ठरला आहे. डेल स्टेन, स्टुअर्ट ब्रॉड आणि जेम्स अँडरसन हे वेगवान गोलंदाज असतील जे नवीन चेंडू शेअर करतील. नाथन लायन संघात एकमेव फिरकीपटू आहे.
क्रिकेट ऑस्ट्रेलियाचा दशकातील कसोटी संघः विराट कोहली (कॅप्टन), अॅलेस्टर कूक, डेविड वॉर्नर, केन विल्यमसन, स्टिव्ह स्मिथ, एबी डिव्हिलियर्स (विकेटकीपर), बेन स्टोक्स, देल स्टेन, स्टुअर्ट ब्रॉड, नाथन लायन, आणि जेम्स अँडरसन.
क्रिकेट ऑस्ट्रेलियाचा दशकातील वनडे संघ: एमएस धोनी (कॅप्टन/विकेटकीपर), रोहित शर्मा, हाशिम अमला, विराट कोहली, एबी डिव्हिलियर्स, शाकिब अल हसन, जोस बुट्ट्लर, रशीद खान, मिशेल स्टार्क, ट्रेंट बोल्ट आणि लसिथ मलिंगा.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)