Steve Smith To Lead Australia Again: स्टिव्ह स्मिथला पुन्हा ऑस्ट्रेलिया संघाचे करणार नेतृत्व? क्रिकेट ऑस्ट्रेलियाने दिले मोठे अपडेट
स्टीव्ह स्मिथ (Photo Credit: Getty Images)

Steve Smith To Lead Australia Again: ऑस्ट्रेलियाचा धडाकेबाज फलंदाज स्टिव्ह स्मिथकडून (Steve Smith) बॉल टेंपरिंग प्रकरणातील सहभागामुळे कर्णधारपद काढून घेण्यात आले असून टिम पेनकडे (Tim Paine) कसोटी संघाची जबाबदारी देण्यात आली होती. स्मिथवर एक वर्षाची बंदीही घालण्यात आली होती मात्र, स्मिथने 2019 मध्ये पुनरागमन करत शानदार कामगिरी करत आहे. त्यामुळे स्मिथने पुन्हा ऑस्ट्रेलियाचे (Australia Cricket Team) नेतृत्व करावे असे अनेकांचे मत आहे आणि आता याबाबत क्रिकेट ऑस्ट्रेलियाने (Cricket Australia) मोठे अपडेट दिले आहे. स्मिथला पुन्हा कर्णधारपदावर नियुक्त केले जाऊ शकते, अशी अटकळ असूनही क्रिकेट ऑस्ट्रेलिया पुरुष संघाच्या नव्या कर्णधाराचा सक्रियपणे विचार करीत नाही, असे मंडळाचे अध्यक्ष अर्ल एडिंग्ज म्हणाले. कर्णधार पेन निवृत्त झाल्यानंतर स्मिथला कर्णधारपद द्यावे असे माजी फलंदाज मार्क वॉ यांनी भारताविरुध्द पहिल्या कसोटी सामन्यापूर्वी म्हटले होते. (ICC Test Rankings: अ‍ॅडिलेडमधील अर्धशतकाचा विराट कोहलीला टेस्ट रँकिंगमध्ये फायदा; जोश हेजलवुड टॉप-5 तर अश्विनची टॉप-10 मध्ये एंट्री)

“सर्व प्रथम आम्हाला मेग (लॅनिंग), आरोन (फिंच) आणि टिम (पेन) येथे तीन महान कर्णधार मिळाले आहेत. काही दमदार युवा कर्णधार समोर येत आहेत. कर्णधारपद हे केवळ स्टीव्हशी जोडले नाही, तर हे एकूण सर्वश्रेष्ठ खेळाडूला जबाबदारी देण्याशी जोडले आहे,” एडिंग्सने ESPNcricinfoला म्हटले. त्यांनी पुढे म्हटले की, “स्टीव्ह हा एक महान तरूण असून तो तिथे असताना तो चांगला कर्णधार होता. त्याठिकाणी नियोजित वारशाची योजना आहे. पुढच्या कर्णधाराविषयी चर्चा करण्यासाठी आम्ही विशेषतः बोर्ड म्हणून बसलो आहोत का? नाही आम्ही नाही.” 2018 बॉल टॅम्परिंग घोटाळ्यानंतर स्मिथला खेळाच्या सर्व स्वरूपातील संघाचा कर्णधार म्हणून काढून टाकण्यात आले होते.

स्मिथनंतर, 36 वर्षीय पेनने पाकिस्तान आणि न्यूझीलंडविरुद्ध विजय मिळवला असून 2001 मध्ये स्टीव्ह वॉनंतर इंग्लंडविरुद्ध घरातील मैदानाबाहेर 2-2 अशी बरोबरी साधताना अ‍ॅशेस कायम राखणारा स्टीव्ह वॉ नंतर ऑस्ट्रेलियाचा पहिला कर्णधार ठरला. दरम्यान, स्मिथ सध्या बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीमध्ये खेळत आहे. अ‍ॅडिलेड येथे यजमानांनी पहिली कसोटी जिंकून 1-0 अशी आघाडी घेतली आहे.