Coronavirus: परवानगीशिवाय आउटडोर सराव सुरु केल्यामुळे BCCI शार्दुल ठाकूर वर नाराज
Shardul Thakur (Photo Credit: Twitter)

प्रशासनाने काही सवलती दिल्या तर टीम इंडियाकडून (Indian Team) नियमित अंतराने खेळणारा वेगवान गोलंदाज शार्दुल ठाकूर (Shardul Thakur) शनिवारी ओउटडोर सरावासाठी मैदानात उतरला. शार्दूलने महाराष्ट्रातील पालघर जिल्ह्यात (Palghar District) काही देशांतर्गत क्रिकेटपटूंबरोबर सराव केला होता, परंतु बीसीसीआय शार्दुलच्या सराव सत्रामुळे नाराज झाला आहे. बीसीसीआयच्या (BCCI)  एका अधिकाऱ्याने म्हटले की शार्दुल हा बीसीसीआयचा करारबद्ध खेळाडू आहे. दुःखाची गोष्ट म्हणजे त्याने स्वत: हून ओउटडोर सराव करण्याचे ठरविले. करोना व्हायरसच्या (Coronavirus) प्रादुर्भावामुळे मागील दोन महिन्यांपासून देशभरात क्रिकेट स्पर्धा बंद करण्यात आलेल्या आहेत. पण, लॉकडाउनच्या चौथ्या टप्प्यात केंद्र सरकारने देशातील मैदानं आणि Sports Complex सुरु करण्याची परवानगी दिली. मात्र क्रिकेटपटूंसाठी आयसीसी व बीसीसीआयने सरावासाठी काही अटी व नियम घालून दिले आहेत. शार्दूलने या अंतर्गत शनिवारी सराव करण्यास सुरुवात केली. मात्र सरावाला सुरुवात करण्याआधी परवानगी न घेतल्यामुळे बीसीसीाय शार्दुलवर नाराज असल्याचं समजतंय. (Lockdown 4.0: लॉकडाउन नियम शिथिल केल्यावर रविचंद्रन अश्विन घेतोय बेबी स्टेप्स, सुरु केले आउटडोर प्रशिक्षण, पाहा VIDEO)

बीसीसीआय अधिकाऱ्याने IANS वृत्तसंस्थेला म्हटल्यानुसार, “शार्दुल बीसीसीआयशी करारबद्ध खेळाडू आहे, त्यामुळे त्याने सरावाला सुरुवात करण्याआधी परवानगी घ्यायला हवी होती. तसं न करता तो स्वतःच ठरवून सरावाला गेला. त्याने असं करायला नको होतं, हे योग्य झालेलं नाही.” मुंबईकर शार्दुल बीसीसीआयच्या क गटाच्या करारश्रेणीत मोडतो. रोहित शर्मा, विराट कोहली, आणि अजिंक्य रहाणे यासारख्या खेळाडूंनीही अद्याप सरावाला सुरुवात केलेली नाही. मुंबई रेड झोन येत असल्यामुळे महाराष्ट्र सरकारने अद्याप त्या क्षेत्रात मैदानं खुली करायला परवानगी दिलेली नाही. देशात महाराष्ट्र राज्यात सर्वात जास्त कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे.

मंडळाच्या सूत्रांनी पुढे सांगितले की, बीसीसीआय जेव्हा खेळाडूंची सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करीत असताना मंडळाची मंजुरी न घेता पुढे जाणे आणि प्रशिक्षणे घेणे हे हुशारपणाचे नव्हते. शार्दूलने पालघर जिल्ह्यात प्रशिक्षणास सुरुवात केली, जो रेड-झोन नसलेला विभाग आहे. पालघर डहाणू तालुका जिल्हा क्रीडा असोसिएशन मैदानावर आयोजित शार्दूलने नेट्स सरावात भाग सरावात होता, असे माध्यमांमधील अहवालात म्हटले आहे. शार्दूलने माध्यमांशी बोलताना सांगितले की, त्याने सरावा दरम्यान चेंडू चमकवण्यासाठी आयसीसी क्रिकेट समितीच्या शिफारशीचे पालन करत लाळचा वापर नाही.