उशिराने धावणाऱ्या लोकलची माहिती आता थेट मोबाईलवर मिळणार; मध्य रेल्वेचे 'नवे अॅप' लवकरच प्रवाशांच्या दिमतीला
Mumbai Railway | Image Used for Representational Purpose Only | (Photo credits: PTI)

मुंबईची लाईफलाईन असलेल्या लोकलवर मुंबईकरांच्या वेळेचे गणित अवलंबून असते. मुंबईच्या धावपळीच्या आणि धकाधकीच्या जीवनशैलीत एक लोकल सुटली की होणारे नुकसान फक्त मुबंईकरांना ठाऊक आहे. त्यातच उशिराने धावणाऱ्या लोकलमुळे मुंबईकर अनेकदा त्रासलेले असतात. मुंबईकरांचा हा त्रास दूर करण्यासाठी रेल्वे प्रशासनाने एक खास पाऊल उचलले आहे. आता लोकलच्या 'रिअल टाईम' ठिकाणाची माहिती प्रवाशांना थेट मोबाईलवर मिळणार आहे. तसंच लोकल किती वेळ उशिराने धावत आहे, याची माहितीही प्रवाशांना मोबाईलवरच दिली जाणार आहे. ही नवी सुविधा ऑगस्टच्या अखेरपासून प्रवाशांच्या मदतीसाठी सज्ज होणार आहे.

तुमच्या आमच्यापैकी अनेकजणांनी स्थानकातील इंडिकेटर बिघडलेले पाहिले असेल. यामुळे प्रवाशांची गैरसोय होते. या संदर्भात अनेक तक्रारी आल्यानंतर मध्य रेल्वे प्रशासन प्रवाशांसाच्या सोयीसाठी नवे मोबाईल अॅप आणत आहे. हे अॅप जीपीएसवर आधारीत असून या अॅपद्वारे संबंधित लोकल फलाटावर येण्यासाठी किती वेळ लागेल याची माहिती प्रवाशांना एका क्लिकवर मिळेल. तसंच लोकलमध्ये बिघाड झाल्यास त्याची माहितीही प्रवाशांना अॅपद्वारे दिली जाईल. मध्य रेल्वेची सेवा मुरबाड-अलिबाग पर्यंत विस्तारणार; कल्याण ते मुरबाड हा नवा मार्ग लवकरच सुरु

इंडिकेटरमधील बिघाडामुळे होणारी गैरसोय टाळण्यासाठी आता नवे पांढऱ्या रंगाचे इंडिकेटर बसवण्यात येणार आहेत. स्थानकांच्या गरजेनुसार लोकल फलाटांवर हे नवे इंडिकेटर बसवण्यात येतील.