Australia National Cricket Team vs Pakistan National Cricket Team: ऑस्ट्रेलिया राष्ट्रीय क्रिकेट संघ आणि पाकिस्तान राष्ट्रीय क्रिकेट संघ यांच्यातील तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेतील 2024 (ODI Series 2024) पहिला सामना मेलबर्नच्या मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर खेळवला गेला. या मालिकेत पॅट कमिन्स ऑस्ट्रेलियाचे नेतृत्व करत आहे. तर पाकिस्तानची कमान मोहम्मद रिझवानच्या हातात आहे. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने पाकिस्तानचा 2 विकेट राखुन पराभव करत मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. प्रथम फलंदाजीसाठी आलेल्या पाकिस्तानने ऑस्ट्रेलियासमोर विजयासाठी 204 धावांचे लक्ष्य ठेवले होते. ऑस्ट्रेलियाने 8 विकेट गमावून 33.3 व्या षटकात हे लक्ष्य गाठले. (हे देखील वाचा: AFG vs BAN ODI Series 2024 Live Streaming: अफगाणिस्तान आणि बांगलादेश यांच्यात रंगणार एकदिवसीय मालिका, 'इथे' जाणून घ्या भारतात कधी अन् कुठे पाहणार सामना)
Pat Cummins, the bowler 🗿
Pat Cummins, the batter 🗿
Pat Cummins, the captain 🗿
He steers Australia home with 32*(31) 👏https://t.co/PjtHZTwBUJ | #AUSvPAK pic.twitter.com/cflTL8y9p4
— ESPNcricinfo (@ESPNcricinfo) November 4, 2024
पाकिस्तान संघाची वाईट सुरुवात
त्याआधी ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून पाकिस्तानला फलंदाजीसाठी आमंत्रित केले. प्रथम फलंदाजीसाठी आलेल्या पाकिस्तान संघाची सुरुवात काही खास झाली नाही. दोन्ही सलामीवीर स्वस्तात बाद झाले. त्यानंतर फलंदाजीसाठी आलेला बाबर आझम काही विशेष करु शकला नाही. तो 37 धावा करुन बाद झाला. पाकिस्तानचा कर्णधार मोहम्मद रिझवान क्रिजवर जास्त वेळ थांबण्याचा प्रयत्न केला पण त्याला दुसरा कोणता फलंदाज साथ देवू शकला नाही. तो 44 धावा करुन बाद झाला. त्यानंतर नसीम शाहच्या 40 धावांच्या जोरावर पाकिस्तान कसा बसा 203 धावा पर्यंत पोहचला. त्यानंतर संपूर्ण संघ 46.4 षटकात बाद झाला.
ऑस्ट्रेलियाची घातक गोलंदाजी
ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजाचे पहिल्या षटकापासून पाकिस्तानच्या फलंदाजावर वर्चस्व दिसून आले. ऑस्ट्रेलियाकडून मिचेल स्टार्कने सर्वाधिक तीन विकेट घेतल्या. तर कर्णधार पॅट कमिन्स आणि ॲडम झाम्पाला प्रत्येकी 2-2 विकेट मिळाल्या. शॉन ॲबॉट आणि मार्नस लॅबुशेन यांनी प्रत्येकी 1-1 विकेट मिळाली.
कर्णधार पॅट कमिन्सने जिंकवला सामना
लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या ऑस्ट्रेलियाला सुरुवातीलाच दोन धक्के लागले. त्यानंतर स्टीव स्मिथ 44 आणि जोश इंग्लिस 49 धावा करुन बाद झाले. या दोघांनी तिसऱ्या आणि चौथ्या विकेटसाठी 93 धावांची सर्वाधिक भागीदारी केली. त्यानंतर फलंदाजीला येणारा मार्नस लॅबुशेन 16 आणि ग्लेन मॅक्सवेल शुन्यावर बाद झाला. संघ सकंटात असताना कर्णधार पॅट कमिन्सने डाव सावरला. त्याच्या महत्वपुर्ण 32 धावांच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने सामन्यात 2 विकेट राखुन विजय मिळवला. पाकिस्तानकडून हरिस रौफने 3 आणि शाहीन आफ्रिदीने 2 विकेट घेतल्या. मालिकेतील दुसरा सामना 8 नोव्हेंबरला भारतीय वेळेनुसार सकाळी 9.00 वाजल्यापासून खेळवला जाईल.