मुंबई: वेस्ट इंडिज क्रिकेटपटू Brian Lara ग्लोबल रुग्णालयात दाखल, छातीत दुखत असल्याने अँजिओग्राफी केल्याचे वृत्त
(Image Credit: IANS)

वेस्ट इंडिजचा महान डावखुरा फलंदाज ब्रायन लारा (Brian Lara) ला मुंबईतील ग्लोबल रुग्णालयात (Global Hospital) दाखल करण्यात आले आहे. लाराच्या छातीत दुखत असल्यामुळे त्याला हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले. सूत्रांच्या माहिती प्रमाणे लाराची अँजिओग्राफी केली. या चाचणीमधून लाराच्या प्रकृतीला कुठलाही धोका नसल्याचे स्पष्ट झाले आहे. सध्या लारा विश्वकपच्या निमित्ताने मुंबईत आला आहे.

लाराने नव्वदच्या दशकात आपल्या फलंदाजीने आंतरराष्ट्रीय  क्रिकेटमध्ये आपला दबदबा निर्माण केला होता. आपल्या आंतरराष्ट्रीय करियर मध्ये वनडे 299 सामन्यात त्याने 10,405 धावा केल्या तर कसोटीमध्ये 34 शतके 48 अर्धशतके तर वनडेमध्ये 19 शतके आणि 63 अर्धशतकं लाराच्या नावावर जमा आहेत.

लारा खेळत असताना त्याची नेहमीच भारताचा महान फलंदाज सचिन तेंडुलकर बरोबर तुलना झाली. लारा सर्वोत्तम की सचिन ही नेहमीच क्रिकेटप्रेमींमध्ये चर्चा व्हायची.