Harris Shield: मुंबईच्या आंतरशालेय स्पर्धेदरम्यान बनला धक्कादायक रेकॉर्ड; शून्यावर बाद झाले सर्व फलंदाज, 754 धावांनी झाला पराभव
प्रतिकात्मक फोटो (फोटो सौजन्य-फेसबुक)

मुंबईतील प्रतिष्ठित शालेय स्पर्धा हॅरिस शिल्डच्या (Harris Shield) पहिल्या फेरीच्या नॉक आउट फेरीत एक धक्कादायकघटना घडली. एक अशी घटना ज्याला चिल्ड्रन वेलफेयर (Children Welfare) शाळा, अंधेरी शक्य तितक्या लवकर विसरू इच्छित असेल. अंधेरीच्या या शालेय संघ बोरिवलीतील स्वामी विवेकानंद इंटरनॅशनल स्कूल (Swami Vivekananda International School) विरुद्ध सामन्यात अगदी तोंडावर पडला असे म्हणटने चुकीचे ठरणार नाही, कारण या मॅचमधील सर्वात विशेष गोष्ट जी लक्षवेधी ठरली ती म्हणजे या संघाचे सर्व फलंदाज शून्यावर बाद झाले. होय, या संघाचा एकही फलंदाज एक धावही करू शकला नाही. स्वामी विवेकानंद संघाने पहिले फलंदाजी करत 3 बाद 761 धावांचा मोठा स्कोर उभारला. मित मयेकर (Meet Mayekar) याने त्रिशतक केले आणि 338 धावांवर नाबाद राहिला. गोलंदाजी करताना गोलंदाजांनी 7 अतिरिक्त धावा (सहा वाइड आणि एक बाय) दिल्या, जर असे नसते तर स्कोरबोर्डवर एकही धावाची नोंद झाली नसती. चिल्ड्रन वेलफेयरचा पूर्ण संघ अवघ्या सहा ओव्हरमध्येच बाद झाला.

मुंबईच्या आंतरशालेय श्रद्धांना जरी उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळत नसला तरीही यामध्ये खेळणारे खेळाडूंनी याचा दर्जा खूप मोठा असल्याचे दाखवून दिले आहेत. सुनील गावस्कर असो किंवा दिलीप वेंगसरकर किंवा सचिन तेंडुलकर किंवा अजिंक्य रहाणे किंवा रोहित रोहित असो, टीम इंडियाच्या या दिग्गज खेळाडूंच्या या स्पर्धेतील त्यांच्या तुफानी खेळाची सर्वांनीच दखल घेतली आहे. स्वामी विवेकानंद शाळेकडून मयेकरने 134 चेंडूंत 338 धावांच्या खेळीत 56 चौकार आणि 7 षटकारां ठोकले. या लाजीरवाणी कामगिरीमुळे चिल्ड्रन वेलफेयर संघाचा 754 धावांच्या मोठ्या फरकाने पराभव झाला. पारंपारिक आंतरशालेय स्पर्धेतील हा कदाचित धावांच्या बाबतीत सर्वात मोठा पराभव असेल.

दरम्यान, असे काही पहिल्यांदा झाले नाही की एखाद्या संघाने एकतर्फी खेळ करत सामना जिंकला आहे. 2016 मध्ये प्रणव धनवडेने मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या वतीने आयोजित केलेल्या अंडर-16 आंतरशालेय सामन्यात नाबाद 1000 धावा केल्या होत्या.