सोशल मीडिया यूजरने बेन स्टोक्सच्या पहिल्या मुलासाठी दिल्या धडकी भरवणाऱ्या शुभेच्छा, इंग्लंड अष्टपैलूने केला खुलासा
बेन स्टोक्स (Photo Credit: Getty Images)

इंग्लंडचा अष्टपैलू खेळाडू बेन स्टोक्स (Ben Stokes) गेल्या काही वर्षांत आपल्या राष्ट्रीय संघासाठी एक मोठा मॅच विनर म्हणून उदयास आला आहे. त्याशिवाय त्याला क्रिकेट विश्वाकडून खूप कौतुकही करण्यात आले आहे. इंग्लंडचा अष्टपैलू क्रिकेटपटू सोशल मीडियावर बर्‍यापैकी सक्रिय राहतो आणि त्याने बर्‍याचदा विशिष्ट विषयावर आपले मत प्रदर्शन केले आहे. परंतु अलीकडेच, त्याला एका अज्ञात व्यक्तीकडून टीकेचा सामना करावा लागला. एखाद्याला स्वीकार्य नाही अशा मर्यादेपर्यंत शिवीगाळ त्या सोशल मीडिया यूजरने केली. 2011 मध्ये स्टोक्सने इंग्लंडकडून पदार्पण केले आणि तेव्हापासून सर्व फॉर्मेटमध्ये तो त्याच्या राष्ट्रीय संघाचा महत्त्वपूर्ण भाग बनला आहे. इंग्लंडच्या (England) 2019 वर्ल्ड कप विजयात त्याने महत्वाची भूमिका बजावली होती. अ‍ॅशेसमध्ये (Ashes) त्याने उत्कृष्ट कामगिरी केली. नंतर, आयसीसीने त्याला आयसीसी प्लेयर ऑफ द ईयर पुरस्काराने सन्मानित केले. पण, असे काही लोक आहेत ज्यांना तो क्रिकेटर म्हणून आवडत नाही. शिवाय, एक लोकप्रिय खेळाडूंचे चाहत्यांसह समीक्षकही असतात. (COVID-19: कोरोना व्हायरसविरुद्ध लढाईत पैसे जमविण्यासाठी जोस बटलर करतोय वर्ल्ड कप फायनलच्या जर्सीचा लिलाव)

अलीकडेच अज्ञात व्यक्तीने सर्व मर्यादा ओलांडल्या आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर स्टोक्सवर शिव्या दिल्या. सर्वप्रथम सोशल मीडिया यूजरने इंस्टाग्रामवर स्टोक्सवर शिवीगाळ केली. त्याने इंग्लंडच्या अष्टपैलूला सांगितले की स्वत:ला मारण्याआधी सांगण्यापूर्वी त्याच्या पहिल्या मुलाला कर्करोग व्हावा. स्टोक्सने त्याचा इन्स्टाग्राम स्टोरीवर त्याचा स्क्रीनशॉट शेअर केला आहे. त्याने यात लिहिले की, “चला यासारख्या लोकांना उघड करूया.” ती व्यक्ती इंस्टाग्रामवरच थांबली नाही त्याने ट्विटरवर स्टोक्सला शिवीगाळ केली. लवकरच, अष्टपैलूने त्याच्या ट्विटरवर एक पोस्ट शेअर केली ज्यामध्ये असे लिहिले आहे की, “ओह, इन्स्टाग्रामवरची व्यक्ती ट्विटरवर पुन्हा तेच करत आहे.” पण, त्या व्यक्तीने लवकरच आपले अपमानजनक पोस्ट हटवले.

कोरोना व्हायरसमुळे ब्रिटन सरकारने देशात लॉकडाऊन जाहीर केल्यावर स्टोक्स सध्या आपल्या दोन मुलांसह आणि पत्नीसमवेत घरी वेळ घालवत आहे. दक्षिण आफ्रिकाविरुद्ध 3-1 ने जिंकलेल्या टेस्ट मालिकेत स्टोक्सने महत्वाची भूमिका बजावली होती.