Virat Kohli (Photo Credit - Twitter)

2 सप्टेंबर 2023 रोजी आशिया कपमध्ये (Asia Cup 2023) भारत आणि पाकिस्तान (IND vs PAK) आमनेसामने येणार आहेत. श्रीलंकेच्या पल्लेकेले स्टेडियमवर होणाऱ्या या सामन्यात सर्वांच्या नजरा चेस मास्टर विराट कोहलीवर (Virat Kohli) असतील. कोहलीला पाकिस्तानविरुद्ध धावा करणे आवडते. अशा परिस्थितीत विरोधी संघातील खेळाडूही त्याला घाबरतात. जे या शानदार सामन्यापूर्वी पाहायला मिळत आहे. पाकिस्तानचा उपकर्णधार शादाब खानने (Shadab Khan) सामन्यापूर्वीच कोहलीचे कौतुक केले आहे. विराट कोहलीने पाकिस्तानविरुद्धच्या केवळ 13 एकदिवसीय सामन्यांमध्ये 536 धावा केल्या आहेत. कोहलीने शेवटचा पाकिस्तानचा सामना केला तेव्हा त्याने 2022 च्या टी-20 विश्वचषकात भारताला विजय मिळवून दिला होता. कोहलीने 18व्या षटकात हरिस रौफच्या चेंडूवर दोन षटकार खेचले. शादाब खानने हे लक्षात ठेवले असून चेस मास्टर कोहली हा खास खेळाडू असल्याचे सांगितले.

कोहलीसारखा कोण नाही - शादाब खान

शादाब खानने स्टार स्पोर्ट्सला सांगितले की, तो नक्कीच जागतिक दर्जाचा खेळाडू आहे. त्याला सामोरे जाण्यासाठी तुम्हाला खूप नियोजन करावे लागेल. असो, आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये मनाचे खेळ खूप असतात कारण त्या पातळीपर्यंत पोहोचण्याचे कौशल्य तुमच्याकडे नक्कीच असते. पण तुम्ही विरोधी खेळाडूचे मन कसे वाचता यावर तुमचे यश अवलंबून आहे. (हे देखील वाचा: IND vs PAK Asia Cup Head to Head: आशिया चषक स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान 13 वेळा आले आमनेसामने, कोणाचे पारडे आहे जड घ्या जाणून)

कोहली कधीही असा पराक्रम करू शकतो

तो पुढे म्हणाला, “विराट कोहली ज्या प्रकारचा फलंदाज आहे, त्याने आमच्याविरुद्ध ज्याप्रकारे कामगिरी केली आहे, विश्वचषकाच्या शेवटच्या सामन्यातही, मला वाटत नाही जगातील कुठलाही फलंदांज त्या स्थितीत असता तर अस काही करु शकला असता. आमची बॉलिंग लाइनअप उत्कृष्ट आहे पण कोहली कधीही असा पराक्रम करू शकतो.