विराट कोहलीला तंबी दिल्याचे वृत्त चुकीचे; BCCI विराटच्या पाठीशी
भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली (Photo: IANS)

चाहत्याला देश सोडण्याचा सल्ला दिल्यानंतर भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीवर (Virat Kohli) बीसीसीआय (BCCI) नाराज असून त्याला तंबी भरल्याचे वृत्त देखील समोर आले होते. मात्र बीसीसीआयने हे वृत्त खोटं असल्याचे स्पष्टीकरण दिले आहे.

"भारतीय फलंदाजीत फारसा दम नाही, त्यापेक्षा इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियाचे फलंदाज अधिक चांगले खेळतात," असं एका चाहत्याने म्हणताच कोहलीला राग अनावर झाला आणि त्याने चाहत्याला देश सोडून जाण्याचा सल्ला दिला.

विराटच्या या उत्तरानंतर प्रसारमाध्यमांशी आणि चाहत्यांशी संवाद साधताना जरा नम्रतेने वाग, अशी तंबी BCCI च्या प्रशासकीय समितीने भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीला (Virat Kohli) दिली असल्याचे वृत्त होते. मात्र या वृत्ताचे खंडन खुद्द बीसीसीआयने केले आहे. हे सर्व वृत्त चुकीचे असल्याचे बीसीसीआयने आपल्या रिपोर्टमध्ये म्हटले आहे.