AUS vs PAK 1st Test: पॅट कमिन्स याचा चेंडू वैध की अवैध? मोहम्मद रिझवान याला नो बॉलवर बाद दिल्याने यूजर्सने थर्ड अंपायरवर केली टीका, पाहा Video

मोहम्मद रिझवान ला पॅट कमिन्स याने बाद करा पॅव्हिलिअनचा मार्ग दाखवला. जेव्हा अंपायरने नो बॉल बघण्यासाठी थर्ड अंपायरकडे निर्णय सोपवला, तेव्हा त्यांनीही रिझवान आऊट असल्याचे म्हटले. यूजर्स थर्ड अंपायर माइकल गॉफ यांच्यावर कसून टीका करू लागले.

(Photo Credit: Twitter)

ऑस्ट्रेलिया (Australia) आणि पाकिस्तान (Pakistan) संघातील पहिला कसोटी सामना ब्रिस्बेनमध्ये खेळला जात आहे. सामन्याच्या पहिल्याच दिवशी एका मोठ्या वादाला सुरुवात झाली. मोहम्मद रिझवान (Mohammad Rizwan) ला पॅट कमिन्स (Pat Cummins) याने बाद करा पॅव्हिलिअनचा मार्ग दाखवला. जेव्हा अंपायरने नो बॉल बघण्यासाठी थर्ड अंपायरकडे निर्णय सोपवला, तेव्हा त्यांनीही रिझवान आऊट असल्याचे म्हटले. थर्ड अंपायरच्या मते कमिन्सचा चेंडू वैध होता आणि त्याचा पाय रेषेच्या आत होता. पण, रिव्यूमध्ये पहिला तेव्हा सर्व लोकं आश्चर्यचकित झाले. सोशल मीडिया यूजर्स थर्ड अंपायर माइकल गॉफ (Michael Gough) यांच्यावर कसून टीका करू लागले. यूजर्सने त्यांना चीटर म्हणत कमिन्सने टाकलेला चेंडू अवैध असल्याचे म्हण्टले. ऑस्ट्रेलियाविरुद्ध ब्रिस्बेन (Brisbane) मध्ये झालेल्या पहिल्या कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवशी पाकिस्तानचा डाव 240 धावांवर संपुष्टात आला. दिवसाचा खेळ संपण्यापूर्वी पाकिस्तानची शेवटची विकेट पडली आणि पहिल्या दिवसाचा खेळ संपण्याची घोषणा करण्यात आली. (AUS vs PAK 1st Test: ऑस्ट्रेलियामध्ये टेस्ट खेळणारा नसीम शाह बनला सर्वात युवा क्रिकेटपटू, कसोटी कॅप मिळताच झाले अश्रू अनावर, पाहा Video)

पाकिस्तानकडून रिझवान शानदार फलंदाजी करत होता. त्याने 37 धावा केल्या होत्या जेव्हा कमिन्स गोलंदाजीची आला. कमिन्सच्या चेंडूवर रिझवानने शॉट खेळण्याचा प्रयत्न केला, परंतु चेंडू त्याच्या बॉलला लागून कीपरकडे गेला आणि अंपायरने त्याला बाद केले. जेव्हा फिल्ड अंपायरने थर्ड अंपायरकडे अंतिम निर्णय सोपवला तेव्हा त्यांनीही चेंडूला वैध संबोधून रिझवानला माघारी धाडले. थर्ड अंपायर मायकल गॉफच्या या निर्णयानंतर यूजर्स संतापले आणि लोकांनी त्यांच्यावर टीका करण्यास सुरवात केली. क्रिकइन्फोने हा व्हिडिओ ट्विटरवर शेअर केला आणि चाहत्यांना विचारले की हा नो बॉल आहे की नाही. नियमांनुसार गोलंदाजाचा पाय क्रीजच्या आत नसल्यास पंच फलंदाजाच्या बाजूने निर्णय देतात. पाहा या घटनेचा हा व्हिडिओ:

अ‍ॅडम गिलक्रिस्ट याने माजी वेगवान गोलंदाज ब्रेट ली याचा एक फोटो शेअर केला. यात लीने  ऍक्शन करत दाखवले की, हा स्पष्टपणे नो बॉल आहे. मला लाईनच्या आत कमिन्सचा पाय दिसत काही इंचाचा फरक आहे, परंतु नो बॉल दिले पाहिजे.

नाही...

एकही शंका नाही हा नो बॉल आहे 

मला पाकिस्तानबद्दल वाईट वाटत आहे, मला वाटते की त्यांना लुटले गेले आहे

पहिल्या टेस्टमध्ये टॉस जिंकून पाकिस्तानने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला, पण त्यांचा हा निर्णय योग्य सिद्ध झाला नाही. संघाची सुरुवात चांगली झाली असली तरीही लंचनंतर एका मागोमाग एक विकेट पाडण्याचे सत्र सुरु राहिले. आणि खेरीस पहिल्या दिवसाखेरीस पाकिस्तान संघ 240 धावांवर ऑल आऊट झाला. ऑस्ट्रेलियाकडून मिशेल स्टार्क याने 4, जोश हेझलवूड याने  3 आणि कमिन्सने 2 गडी बाद केले.