Assam Floods 2019: आसाम महापुरची स्थिति पाहून रोहित शर्मा, वीरेंद्र सेहवाग आणि अन्य क्रिकेटपटूंची मदतीस धाव; Twitter वर केले भावनात्मक आव्हान
वीरेंद्र सेहवाग आणि रोहित शर्मा (Photo Credit : Twitter/IANS)

भारताच्या आसाम (Assam) राज्यात अतिवृष्टीमुळे आलेल्या महापुरात मनुष्यच नाही तर प्राण्यांना देखील प्रचंड हानी पोहचली आहे. पुरामुळे राज्याची स्तिथी चिंताजंक बनलेली आहे. लाखो लोकांना त्यांच्या घरातून स्थलांतरित करण्यात आले आहे. आसाममधील पूरग्रस्त परिस्थितीत तेथील नागरिकांना मदत करण्याच्या हेतूने सुवर्णकन्या हिमा दासने तिच्या पगाराची निम्मी रक्कम पूरग्रस्तांसाठी दिली आहे. शिवाय अन्य लोकांना देखील मदतीसाठी आव्हान केले आहे. हिमाप्रमाणे भारताचे क्रिकेटपटू देखील मागे राहिलेले नाही. भारताचे माजी आणि उपस्थित क्रिकेटपटू- रोहित शर्मा (Rohit Sharma), वीरेंद्र सहवाग (Virender Sehwag), मोहम्मद कैफ (Mohammad Kaif), सुरेश रैना (Suresh Raina) यासारख्या खेळाडूंनी ट्विटरवर चाहत्यांना मदतीसाठी आव्हान केले. (सुवर्ण कन्या हिमा दास ने Assam Flood Relief साठी अर्ध्या महिन्याचे वेतन केले दान, मदतीसाठी केली अपील)

आसाममधील महापुरामुळे गेंड्यांसाठी प्रसिद्ध असलेल्या या अभयारण्याच्या 430 चौ. किमी. क्षेत्रफळाच्या काझीरंगा अभयारण्यात (Kaziranga National Park) 90 टक्के भागात पाणी शिरले आहे. त्यामुळे सर्व प्राणी जीव बचावण्याकरिता उंच जागी जाण्याची धडपड करीत आहेत. यातील अनेक प्राणी रस्त्यावर देखील आलेले दिसत आहेत. त्यामुळे रोहितने तेथील रहिवाश्यांना वाहनं सावकाश चालवण्याचे आवाहन केले आहे. पहा हे ट्विट्स:

आसाममधील पूरपरिस्थितीमुले 33पैकी 30 जिल्हे पाण्याखाली गेली आहेत. आसाममधील ब्रह्मपुत्रा नदी धोक्याच्या पातळीच्यावर वाहत आहे. त्यामुळे स्थिती अजून बिकट होण्याची चिन्हे आहे.