IPL 2020 मध्ये कोणाला करणार Mankad रन-आऊट? रविचंद्रन अश्विन याने फॅनच्या प्रश्नावर प्रत्युत्तर देत फलंदाजांना दिली  चेतावणी
रविचंद्रन अश्विन (Photo Credit: IANS)

सोमवारी ट्विटरवर एका यूजरने भारतीय फिरकी गोलंदाज रविचंद्रन अश्विन (Ravichandran Ashwin) याला विचारले की, आयपीएल (IPL) 2020 मध्ये कोणत्या फलंदाजाला मंकडद्वारे धावबाद करेल? अश्विन आजकाल सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे. सरत्या वर्षाच्या 2019 अखेरच्या दिवशी अश्विनने चाहत्यांना त्याच्या ट्विटरवर प्रश्न विचारण्यासाठी आमंत्रित केले. याचाच फायदा घेत यूजरने अश्विनला मंकड बाबतीत प्रश्न विचारला ज्याच्यावर फिरकीपटूनेही अचूक उत्तर दिले. अश्विनने ट्विटर अकाउंटवर लिहिले- "नमस्कार मित्रांनो, क्रिकेटमध्ये काय चालले आहे. मी आज प्रश्नोत्तराचे सत्र खेळण्याच्या मनःस्थितीत आहे आणि हो, प्रश्न विचारत असताना हॅशटॅग लावण्यास विसरू नका. यावर एका यूजरने त्याला विचारले की, "या आगामी आयपीएलच्या हंगामात तुम्ही कोणत्या फलंदाजाला मंकड धावबाद कराल.?" यावर अश्विन म्हणाला, "जो कोणी क्रीज ओलांडेल तो मंकडीगद्वारे आउट होईल." (IPL 2020 Schedule: 29 मार्च पासून रंगणार आयपीएल 2020 थरार, मुंबई येथील वानखेडे स्टेडियमवर खेळला जाणार पहिला सामना)

अश्विनने यापूर्वी 2019 च्या आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्सचा फलंदाज जोस बटलर याला मंकड पद्धतीने धावबाद केले होते. याच्यानंतर अश्विनच्या  जात होती. यूजरच्या प्रश्नावर अश्विनचीही प्रतिक्रिया सर्व फलंदाजांची एक चेतावणी आहे कि आगामी स्पर्धेत कोणीही आपली क्रीज ओलांडू नये. रन-अप नंतर आणि बॉल टाकण्याआधी नॉन-स्ट्राइकरने क्रीज सोडल्यावर फलंदाजाला धावबाद करण्याला मंकड म्हटले जाते.

13 डिसेंबर 1947 मधील भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील कसोटी सामन्यादरम्यान भारताच्या विनू मंकड याने ऑस्ट्रेलियाच्या विल ब्राऊनला अशाच प्रकारे बाद केले होते. तेव्हापासून या पद्धतीला वीणूच्या आडनावावर आधारित 'मॅनकडींग' म्हटले जाते. कित्येक दिवस चाहत्यांमध्ये याबाबत संताप होता. काहींनी हि कृती क्रिकेटमधील खेळाच्या भावाविरूद्ध असल्याचे म्हटले आहे, तर तज्ज्ञांनी सांगितले की ते नियमात आहे आणि गोलंदाज त्याचा वापर करू शकतात.