विराट कोहली झाला 'या' 7 वर्षाच्या मुलाचा फॅन, थांबून ऑटोग्राफ घेतला तर अनुष्का शर्माने दिली 'अशी' प्रतिक्रिया, पहा व्हिडिओ
(Photo Credit: @VeniVidiVici_08/Twitter)

भारतीय क्रिकेट संघाचा (Indian Team) वेस्ट इंडीज (West Indies) दौरा चांगला होता. टीम इंडियाने तीन सामन्यांची टी-20 आणि टेस्ट मालिकेत विंडीजचा व्हाईटवॉश करत मालिका खिशात घातली तर, तीन सामन्यांची वनडे मालिकादेखील 2-0 अशी जिंकली. या मालिकेतील पहिला वनडे सामना पावसामुळे रद्द करण्यात आला होता. यानंतर संघ आता 15 सप्टेंबरपासून दक्षिण आफ्रिकेविरूद्ध घरच्या मैदानावर टी-20 आणि कसोटी मालिका खेळणार आहे. ही मालिकादेखील वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा भाग असेल. दरम्यान, विंडीजविरुद्ध टेस्ट मालिका जिंकल्यानंतर कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) आणि पत्नी अनुष्का शर्मा (Anushka Sharma) यांचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियात व्हायरल होत आहे. असे तर कोहलीच्या चाहत्यांची संख्या जगात कमी नसली तरी वेस्ट इंडिजमध्ये असे कोणीतरी आहेत ज्यांचे स्वतः कोहली फॅन झाला आहे. (विराट कोहली याला झटका, ICC Test क्रमवारीत स्टीव्ह स्मिथ याने मिळवले अव्वल स्थान)

कसोटी मालिका संपल्यानंतर विराट त्याची पत्नी अनुष्का शर्मा सोबत कुठेतरी जात होता, जेव्हा एका 7 वर्षाच्या मुलाने त्याच्याकडे ऑटोग्राफ मागितले. विराट म्हणाला, थांब, मला तुझा ऑटोग्राफ हवा आहे. कोहलीचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये विराट त्या लहान चाहत्याकडून ऑटोग्राफ घेताना दिसत आहे, तर अनुष्का हे पाहून खूप आनंदी झाली आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात शेअर केला जात आहे.

वेस्ट इंडिजविरूद्ध टेस्ट मालिका जिंकल्यानंतर कोहली भारताचा सर्वात यशस्वी कसोटी कर्णधार ठरला. कोहलीने कर्णधार म्हणून परदेशात सर्वाधिक कसोटी विजयांची नोंद करण्याच्या दृष्टीने माजी कर्णधार महेंद्र सिंह धोनी याला मागे टाकले आहे. आता विराट परदेशात भारताचा सर्वात यशस्वी कसोटी कर्णधार बनला आहे. धोनीच्या नेतृत्वात भारताने परदेशात 27 कसोटी सामने जिंकले होते, तर विराटच्या नेतृत्वात टीम इंडियाने 28 सामने जिंकले आहेत. अँटिगा येथे वेस्ट इंडिजविरुद्ध पहिल्या टेस्ट सामन्यात भारताने 318 धावांनी विजय मिळवला, तर जमैका येथे झालेल्या दुसर्‍या सामन्यात संघाने 257 धावांनी विजय मिळविला.