भारतीय संघाचे माजी प्रशिक्षक अनिल कुंबळे यांना आजही 'त्या' गोष्टीचा वाटतो खेद, 2017 मध्ये सोडले होते प्रशिक्षक पद
अनिल कुंबळे (Photo Credit: Getty)

अनुभवी फिरकीपटू अनिल कुंबळे (Anil Kumble) यांना भारतीय क्रिकेट संघाचे (Indian Team) मुख्य प्रशिक्षक म्हणून काम केल्याबद्दल कोणतीही खेद नाही पण शेवट अधिक चांगला झाला असता असे त्यांना वाटते. भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीशी (Virat Kohli) झाल्याने मतभेदामुळे कुंबळे यांनी 2017 मध्ये चॅम्पियन्स ट्रॉफीनंतर प्रशिक्षक पद सोडले. माजी कर्णधार कुंबळेने ऑनलाइन सत्रात झिम्बाब्वेचा माजी क्रिकेटपटू पॉमी मबांग्वाशी (Pommie Mbangwa) संवाद साधला. 49 वर्षीय कुंबळे म्हणाले, "त्या एका वर्षाच्या कालावधीत आम्ही खूप चांगले काम केले. मी काही योगदान दिले याबद्दल मला खरोखर आनंद झाला आणि त्याबद्दल काही खेद नाही. तिथूनही पुढे जाण्यात मला आनंद झाला." भारताचे माजी कर्णधार आणि दिग्गज गोलंदाज कुंबळे यांना याबद्दल खेद वाटत नाही, परंतु त्यांचा कार्यकाळ अधिक चांगल्या प्रकारे संपला असता असे त्यांचे म्हणणे आहे. (वसीम अक्रमने सांगितली 1999 दिल्ली टेस्ट सामन्यातली आठवण, अनिल कुंबळे कडून आऊट होण्यापूर्वी वकार युनुसला दिल्या 'या' सूचना)

ते म्हणाले, "मला माहित आहे की हे चांगले संपू शकले असते, परंतु तरीही ठीक आहे. पुढे जाण्याची वेळ येते तेव्हा कोच म्हणून तुम्हाला जाणीव होते, प्रशिक्षकालाच पुढे जाण्याची गरज असते. मी खरोखर आनंदी होतो, त्या एका वर्षात मी खूप महत्वाची भूमिका निभावली." प्रशिक्षक म्हणून कुंबळेसाठी एक वर्ष यशस्वी ठरले. या दरम्यान टीम इंडियाने 2017 चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात प्रवेश केला होता तसेच एक अत्यंत मजबूत कसोटी संघ होता, ज्याने आपल्या कार्यकाळात 17 कसोटींपैकी केवळ एक सामना गमावला होता.

माजी प्रशिक्षक म्हणाले, "भारतीय प्रशिक्षकाची भूमिका घेतल्याने मला खूप आनंद झाला. मी भारतीय संघाबरोबर घालवलेले एक वर्ष खरोखर विलक्षण होते." भारतासाठी 132 कसोटी सामन्यात 619 विकेट्स आणि 271 वनडेत 337 विकेट घेणारे कुंबळे म्हणाले, "सर्वोत्कृष्ट खेळाडूंसोबत असणे आणि भारतीय ड्रेसिंग रूममध्ये भाग घेणे ही एक चांगली भावना आहे." दुसरीकडे, कुंबळे यांनी सध्या इंडियन प्रीमियर लीगमधील किंग्ज इलेव्हन पंजाब फ्रेंचायझीचे मुख्य प्रशिक्षकपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहेत.