टीम इंडियासाठी 16 वनडे खेळलेल्या वेणुगोपाल राव याची क्रिकेटमधून निवृत्ती
प्रतिकात्मक फोटो (फोटो सौजन्य-फेसबुक)

भारतीय क्रिकेटपटू आणि आंध्र प्रदेशचा (Andra Pradesh) माजी कर्णधार वेणुगोपाल राव (Venugopal Rao) याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. आंध्र प्रदेश क्रिकेट असोसिएशनने पत्रकाद्वारे याबद्दल माहिती दिली. आंध्र क्रिकेट असोसिएशनने त्याच्या क्रिकेटमधील योगदानाबद्दल आभार मानले आहेत. 37 वर्षीय वेणुगोपालने भारताकडून 16 वनडे सामने खेळले आहेत. त्याने श्रीलंका (Sri Lanka) विरुद्ध 30 जुलै 2005 साली क्रिकेटमध्ये पदार्पण केलं होतं. वेणुगोपालच्या प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये 7 हजारपेक्षा जास्त धावांची नोंद आहे. तर ए लिस्ट क्रिकेटमध्ये त्याने 4 हजारपेक्षा जास्त धावा केल्या आहेत. त्याला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये मात्र प्रभाव दाखवता आला नाही. राव यांनी शेवटचा सामना 23 मे 2006 रोजी वेस्ट इंडिज )West Indies) विरूद्ध बॅस्टरमध्ये खेळला होता. (क्रिकेटर पृथ्वी शॉ याचे आठ महिन्यांसाठी निलंबन, कफ सिरप मधून डोपिंग केल्याप्रकरणी BCCI ची कठोर कारवाई)

भारताच्या 2000 मधील अंडर-19 विजयी संघात युवराज सिंह आणि मोहम्मद कैफ सह राव देखील सहभागी होते. राव यांनी 65 आयपीएल (IPL) सामने देखील खेळले आहेत. त्याने डेक्कन चार्जर्स (Deccan Chargers), दिल्ली डेअर डेव्हिल्स (Delhi Daredevils) आणि सनरायजर्स हैदराबाद (Sunrisers Hyderabad) या संघाचे प्रतिनिधीत्व केलं आहे. 2009 च्या आयपीएल विजेत्या संघातही वेणुगोपाल होता.

16 वनडे सामन्यांत 24.22 च्या सरासरीने 218 धावा केल्या. यात केवळ एका अर्धशतकाचा समावेश आहे.