
WIvsENG Test Series: वेस्ट इंडीज येथे सुरु असलेल्या वेस्ट इंडीज (West Indies) विरुद्ध इंग्लड (England) या कसोटी सामन्यामध्ये वेस्ट इंडीजने विजयी सरशी घेतली आहे. पण संघाच्या विजयापेक्षा वेस्ट इंडीजच्या धडाकेबाज गोलंदाजअलझारी जोसेफ (Alzarri Joseph) याचं विशेष कौतुक होत आहे. त्याचं कारण म्हणजे खेळाच्या दिवशी आईच्या निधनाची बातमी समजली तरीही अलझारी जोसेफ याने खेळाच्या मैदानात उतरण्याचा निर्णय घेतला.अलझारी जोसेफ मैदानात उतरल्यावर मैदानात उपस्थित सर्व प्रेक्षकांनी उभं राहुन त्याचं कौतुक केलं.
Very sad news. Our thoughts are with Alzarri and his family. https://t.co/jJ5BAf8heC
— England Cricket (@englandcricket) February 2, 2019
अलझारी जोसेफ याची आई मागील काही दिवसांपासून आजारी होती. आजारपणातच तिने अखेरचा श्वास घेतला. दुसरीकडे अलझारी जोसेफ याला 18 महिन्यांनंतर कसोटी संघात पुनरागमन करण्याची संधी मिळाली होती. त्याने स्वतःच वैयक्तिक दु;ख बाजूला ठेवत खेळण्याचा निर्णय घेतला. अवघ्या २२ वर्षीय अलझारी जोसेफ याने 20 बॉलमध्ये एका चौकाराच्या मदतीने 7 धावा केल्या. त्याला बेन स्टोक्सने आउट केलं. दोन्ही संघ मैदानात अलझारी जोसेफच्या आईला श्रद्धांजली म्हणून काळी पट्टी बांधून उतरली होती.