विजय शंकर याने Body Transformation दाखवत शेअर केला शर्टलेस फोटो,  ट्रोल करत Netizens म्हणाले बॉलिवूडवर नको क्रिकेटवर लक्ष दे
विजय शंकर (Photo Credit: Twitter)

भारताचा अष्टपैलू विजय शंकर (Vijay Shankar) सध्या टीम इंडियामधून बाहेर आहे. विश्वचषकमध्ये दुखापतीनंतर विजयने भारतीय संघातील (Indian Team) स्थान गमावले. मात्र, सध्या सुरु असलेल्या विजय हजारे ट्रॉफीमध्ये शानदार फलंदाजी करत संघात पुनरागमन करण्याच्या तो प्रयत्नात आहे. दरम्यान, नुकतेच विजयने त्याच्या बॉडी ट्रान्सफॉर्मशन (Body Transformation) बाबतचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे.  याद्वारे त्याने शरीराबद्दल घेतलेल्या कठोर परिश्रम दाखवण्याचा प्रयत्न केला. विजयने शेअर केलेल्या एका फोटोमध्ये त्याचा जुना लूक दिसत आहे, तर दुसर्‍यामध्ये तो शर्टलेस उभा राहत त्याचे रूपांतरित शरीर दिसत आहे. ज्यामध्ये त्याचे अ‍ॅब्स दिसत आहेत. विजयचा हा फोटो पाहून कशी सहकारी क्रिकेटपटूंनी त्याचे कौतुक केले, तर इतर सोशल मीडिया यूजर्सना त्याचे हा अंदाज पसंत आला नाही आणि त्यांनी त्याला ट्रोल करण्यास सुरुवात केली.

बॉडी ट्रान्सफॉर्मशनचा फोटो शेअर करत विजयने कॅप्शनमध्ये लिहिले, "घाम, वेळ, भक्ती.तो फेडतो!" त्याने हा फोटो इंस्टाग्राम आणि ट्विटर दोन्हीकडे शेअर केला आहे. टीम इंडियाच्या केवळ वनडे संघाचा भाग असेलेल्या विजयने 2019 मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. 2019 च्या आयपीएलमध्ये तो सनरायझर्स हैदराबादकडून खेळला पण त्याला त्याच्या कौशल्याचा योग्य वापर करता आला नाही. दरम्यान, विजयच्या फोटोवर यूजर्सना कोणतेही महत्त्वपूर्ण बदल दिसुन आले नाही आणि त्यांनी त्यांची चेष्टा करण्यास सुरवात केली. तर काहींनी विजय टीम इंडियात लवकरच पुनरागमन करण्याचा विश्वासही दाखवला.

पहा सोशल मीडिया यूजर्सच्या प्रतिक्रिया:

भावा, तुला क्रिकेटमध्ये कौशल्य दाखवायचे आहे, बॉलीवूडमध्ये नाही

जिपर काढण्यासाठी इतके प्रयत्न?

भाई, बॅटिंग पण करावी लागणार आहे

विश्वचषकात अवघ्या 30 धावा केल्या असतील आणि आपली बॉडी दाखवतोय

विश्वचषक 2019 मध्ये अंबाती रायडू याच्याकडे दुर्लक्ष करत विजयची भारतीय संघात निवड करण्यात आली होती. विश्वचषकमध्ये जेव्हा त्याला संघात निवडले गेले तेव्हा बरेच लोक आश्चर्यचकित झाले होते. त्याच्याकडून मधल्याफळीत चांगला खेळ करण्याची मोठी अपेक्षा होती, पण त्याने सर्वांना निराश केले. त्याची अष्टपैलू म्हणून त्यांची निवड झाली होती, परंतु दुखापतीसह तो मायदेशी परतला. सध्या सुरु असलेल्या विजय हजारे ट्रॉफीमध्ये विजय चांगला परफॉर्म करत आहे. 28 वर्षीय विजयने सात सामन्यांत 81.75 च्या सरासरीने 327 धावा केल्या आहेत. त्याची सर्वाधिक धावसंख्या नाबाद 91 धावा अशी आहे.