T10 League 2020: कोरोना संकटा दरम्यान नोव्हेंबरमध्ये होणार अबुधाबी टी-10 लीगचे आयोजन, तारखा जाहीर
अबू धाबी टी-10 लीग (Photo Credit: Getty Images)

कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भावामुळे एकीकडे क्रीडा स्पर्धा ठप्प झाल्या आहेत, तर यावर्षी नोव्हेंबरमध्ये क्रिकेटचा सर्वात छोटा आणि सर्वात रोमांचक फॉर्म टी-10 खेळला जाणार आहे. इंग्लंडच्या विश्वचषक विजेत्या कर्णधार इयन मॉर्गनसह काही अव्वल क्रिकेटर्सनी समर्थन केलेल्या अबूधाबी टी-10 स्पर्धेचे आयोजन 19 ते 28 नोव्हेंबर दरम्यान संयुक्त अरब अमिरातीच्या राजधानीत होईल. कोरोना व्हायरस आजाराचा क्रिकेट कॅलेंडरवर तीव्र परिणाम होत असूनही या कार्यक्रमाच्या तारखांची पुष्टी करण्यात आली आहे. टी-10 लीग हा 10 ओव्हर्सचा फॉर्मेट असून युएईमध्ये अमिराती क्रिकेट मंडळाची मान्यता मिळाल्यावर हा कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहे. स्पर्धेत एक राउंड रॉबिन फेरीनंतर अ‍ॅलिमिनेटर आणि फायनल सामना खेळला जातो. प्रत्येक सामन्याचा कालावधी 90 मिनिटे असतो.

या कार्यक्रमाच्या 2020 आवृत्तीचे आयोजन संस्कृती व पर्यटन विभाग अबूधाबी, अबू धाबी क्रीडा परिषद आणि अबू धाबी क्रिकेट करणार आहे. मागील आवृत्तीत शेख झाएद क्रिकेट स्टेडियम 10 दिवसांत 120,000 पेक्षा जास्त चाहत्यांची गर्दी जमली होती. लीगची 2019 आवृत्ती ड्वेन ब्रावोच्या नेतृत्वात मराठा अरेबियन्सने जिंकली.

सध्या कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे संपूर्ण जग लॉकडाउन अवस्थेत आहे. दुबई येथे होणाऱ्या या स्पर्धेच्या तिसर्‍या आवृत्तीच्या तारखांची घोषणा करण्यात आली असली तरी सरकारच्या अंतिम निर्णय निर्णयावर कार्यक्रमाचे आयोजन अवलंबून आहे. 2017 मध्ये सुरू झालेल्या या स्पर्धेच्या तीन आवृत्त्या झाल्या आहेत आणि प्रत्येक वेळी नवीन संघ विजयी झाला आहे. पहिल्या सत्रात केरळ किंग्जने पंजाब लिजेंड्सचा पराभव करून स्पर्धा जिंकली. 2018 मध्ये, नॉर्दन वॉरियर्सने फाख्तुनसचा पराभव करून जेतेपद जिंकले. मागील वर्षी मराठा मराठा अरेबियन्सने अंतिम सामन्यात डेक्कन ग्लेडिएटर्सला पराभूत केले.