50 Years of Sunil Gavaskar: क्रिकेटचे लिटिल मास्टर सुनील गावस्कर यांची पन्नाशी; सचिन तेंडुलकरने केला सलाम तर BCCI कडून मिळाला सन्मान
माजी भारतीय क्रिकेटर सुनील गावस्कर (Photo Credit: PTI)

50 Years of Sunil Gavaskar: 6 मार्च 2021, म्हणजेच आज सुनील गावस्कर (Sunil Gavaskar) यांनी भारतीय क्रिकेटमध्ये (Indian Cricket) 50 वर्षे पूर्ण केली. टीम इंडियाचे माजी कर्णधार सुनील गावस्कर पाच दशकांनंतरही विविध भूमिकांद्वारे खेळाशी संबंधित आहेत. सत्तरच्या दशकाच्या सुरूवातीला गावस्कर भारतीय क्रिकेटमध्ये म्हणून पहिल्यांदा आंतरराष्ट्रीय मैदानावर उतरले होते. वेस्ट इंडिज (West Indies) दौऱ्यावर त्यांना पहिल्यांदा कसोटी सामना खेळण्याची संधी मिळाली. पोर्ट ऑफ स्पेन (Port of Spain) येथे त्यांनी वयाच्या 21व्या वर्षी तत्कालीन भयावह कॅरिबियन संघाविरुध्द पदार्पण केले आणि पहिल्याच सामन्याने आपली छाप सोडली. त्या सामन्यात पहिले फलंदाजीने मोठा पराक्रम नोंदवला होता. त्यांनी दुसर्‍या सामन्यात 6 मार्च, 1971 रोजी कसोटी सामन्यात पदार्पण केले आणि भारतीय क्रिकेटचे एक नामांकित स्टार बनले. या खास दिवशी मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकरसह (Sachin Tendulkar) अनेक दिग्गज खेळाडूंनी गावस्कर यांना सलाम केला तर बीसीसीआयने (BCCI) लिटिल-मास्टरला “बॅगी ब्लू” कॅप देत सन्मानित केले. (IND vs ENG 4th Test 2021: टीम इंडियाच्या ‘या’ दिग्गज खेळाडूची भविष्यवाणी, म्हणाले- ‘तीन दिवसांत संपणार चौथी अहमदाबाद टेस्ट’)

‘माझ्या आयडॉलसाठी एक ट्रिब्यूट!’ असं कॅप्शन देत सचिनने ट्विटरवर एक पोस्ट शेअर केली ज्यात त्याने गावस्करांसाठी खास संदेश लिहिला. क्रिकेटचा देव आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या तेंडुलकरने त्यांचे अभिनंदन केले आणि पोस्टमध्ये म्हटले की, 'माझ्या आदर्शाला समर्पित, तुम्ही माझे नायक आहात आणि कायमच राहाल. आपण आम्हाला गर्विष्ठ केले आहे." गावस्कर यांनी विंडीज संघाविरुद्ध दोन्ही डावात अनुक्रमे नाबाद 65 आणि 67 धावा केल्या. यासह गावसकर यांनी आपल्या पहिल्या कसोटी मालिकेतील चार सामन्यांमध्ये 774 धावा केल्या आहेत, जो अद्याप एका कसोटी मालिकेत एका भारतीय फलंदाजाने केलेल्या सर्वाधिक वैयक्तिक धावांचा रेकॉर्ड आहे.

दुसरीकडे, गावस्कर यांच्या कर्तृत्वाबद्दल बीसीसीआयनेही त्यांचा गौरव केला आणि इंग्लंडविरुद्ध अहमदाबाद येथे सुरु असलेल्या चौथ्या कसोटी सामन्यादरम्यान बीसीसीआय सचिव जय शाह यांनी गावस्कर यांना आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील 50 वर्षे पूर्ण केल्याबद्दल मोमेंटो देऊन सन्मानित केले.

तब्बल 16 वर्षाच्या क्रिकेट कारकिर्दीत गावस्कर यांनी अनेक रेकॉर्ड मोडले. खेळाच्या पारंपारिक स्वरुपात एक महान फलंदाज म्हणून ओळखल्या जाणार्‍या लिटिल मास्टरने 125 कसोटी सामने खेळले आणि त्यामध्ये 51.12 च्या सरासरीने 10,122 धावा केल्या. त्यांच्या नावावर 34 कसोटी शतके आणि 45 अर्धशतकांचाही समावेश आहे.