Jasprit Bumrah on Test Captaincy: 'खूप आधीच कसोटी कर्णधारपदाची ऑफर मिळाली होती'; जसप्रीत बुमराहचा धक्कादायक खुलासा

भारतीय संघाच्या कसोटी कर्णधारपदाची अनेक दिग्गज खेळाडूंना ऑफर दिली गेल्याच सांगण्यात आलं होत. त्यावर आता खुद्द जसप्रीत बुमराहने धक्कादायक खुलासा केला आहे.

Jasprit Bumrah on Test Captaincy: 'खूप आधीच कसोटी कर्णधारपदाची ऑफर मिळाली होती'; जसप्रीत बुमराहचा धक्कादायक खुलासा
Jasprit Bumrah (Photo Credit - X)

Jasprit Bumrah on Test Captaincy: भारतीय संघाच्या (Team India) कसोटी कर्णधारपदाची गेल्या काही दिवसांपासून चर्चा रंगली होती. अनेक दिग्गज खेळाडूंना ऑफर दिली गेल्याच सांगण्यात आलं होते. त्यावर आता खुद्द जसप्रीत बुमराहने (Jasprit Bumrah) धक्कादायक खुलासा केला आहे. त्याला बीसीसीआयकडून कसोटी कर्णधारपदाची ऑफर मिळाली होती पण त्याने ती नाकारली. त्याने म्हटले आहे की रोहित आणि विराट निवृत्त होण्यापूर्वीच त्याला ही ऑफर मिळाली होती परंतु कामाच्या ताणामुळे त्याने ती स्वीकारली नाही.

ऑफर आयपीएल दरम्यान मिळाली

भारतीय संघाचा वरिष्ठ वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने एक धक्कादायक खुलासा केला आहे. बुमराहने म्हटले आहे की बीसीसीआयने त्याला कसोटी कर्णधारपदाची ऑफर दिली होती. परंतु त्याने ती ऑफर नाकारली. रोहितने मे महिन्यात कसोटी क्रिकेटला निरोप दिला होता. त्याच्यानंतर, संघाचे नेतृत्व शुभमन गिलकडे सोपवण्यात आले, जो इंग्लंड दौऱ्यापासून आपल्या कर्णधारपदाच्या कारकिर्दीची सुरुवात करेल.

ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळल्या गेलेल्या पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेत बुमराहने दोन सामन्यांचे नेतृत्व केले. मेलबर्नमध्ये खेळल्या गेलेल्या मालिकेतील पहिल्या सामन्यात तो संघाचा कर्णधार होता. त्याच वेळी, या दौऱ्यात मालिकेच्या शेवटच्या सामन्यात त्याने सिडनीमध्येही नेतृत्व केले. बुमराह त्याच्या कर्णधारपदाच्या खेळानी आणखी लोकप्रिय झाला.

हा व्हिडिओ देखील पहा

स्काय स्पोर्ट्सशी बोलताना बुमराह म्हणाला की, रोहित शर्मा आणि विराट कोहलीने कसोटी संघाला निरोप देण्याच्या खूप आधी बीसीसीआयने त्याला कसोटी संघाचे कर्णधारपद देऊ केले होते. तो या मुलाखतीत म्हणाला, "रोहित शर्मा आणि विराट कोहली निवृत्त होण्यापूर्वी, आयपीएल दरम्यान मी बीसीसीआयशी बोललो होतो. मी पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेच्या संदर्भात माझ्या कामाच्या ताणाबद्दल बोललो. माझ्या पाठीच्या दुखण्याची काळजी घेणाऱ्यांशी मी बोललो. आम्ही या निष्कर्षापर्यंत पोहोचलो होतो की मला माझ्या दुखापतीबद्दल थोडी सावधगिरी बाळगावी लागेल. यानंतर, मी बीसीसीआयला फोन केला आणि त्यांना सांगितले की नेतृत्वासाठी माझा विचार केला जाऊ नये कारण मी संपूर्ण कसोटी सामना खेळू शकणार नाही."

पुढे बुमराह म्हणाला, "बीसीसीआय माझ्याकडे नेतृत्वाच्या भूमिकेसाठी पाहत होते, परंतु मला त्यांना नकार द्यावा लागला कारण एखाद्याने फक्त तीन सामन्यांसाठी कर्णधारपद करणे आणि नंतर दुसऱ्याने उर्वरित सामन्यांचे नेतृत्व करावे हे योग्य नाही. हे संघासाठी योग्य नाही आणि मी संघाला प्रथम स्थान देऊ इच्छितो." असे आगरकर यांनी ही म्हटले होते. मात्र, त्यात काही तफावत असल्याचे कहींचे म्हणणे आहे.

बुमराह आणि मुख्य निवडकर्ता अजित आगरकर यांच्या विधानांमध्ये विरोधाभास आहे. इंग्लंड दौऱ्यासाठी गिल आणि टीम इंडियाचा कर्णधार म्हणून घोषणा करताना आगरकर म्हणाले होते की बीसीसीआयला बुमराहने त्याच्या कामावर लक्ष केंद्रित करावे आणि कसोटी कर्णधारपदाचा जास्त भार घेऊ नये अशी इच्छा आहे. आगरकर म्हणाले होते की त्यांनी बुमराहला याबद्दल सांगितले आहे.

(The above story first appeared on LatestLY on Jun 18, 2025 09:40 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).