Conflict Of Interest च्या वादनंतर लोकपालांनी सचिन, सौरव आणि लक्ष्मण ला खडसावले; कॉमेंट्री किंवा आयपीएल, काहीतरी एकच निवडा
(File Photo)

भारतीय क्रिकेटची त्रिमूर्ती, माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar),सौरव गांगुली (Sourav Ganguly) आणि व्हीव्हीएस लक्ष्मण (VVS Laxman) हे सध्या आयसीसी (ICC) विश्वकपमध्ये समालोचन करत आहे. मात्र, त्यांच्या या भूमिकेवर बीसीसीआय चे लोकपाल डी. के जैन (DK Jain) यांनी आक्षेप घेतला आहे. जैन यांनी विचारले, 'हे तिघेही जण आयपीएल (IPL) मधील काही संघांशी जोडले गेले आहेत. मग ते विश्वचषकात समालोचक म्हणून कसे काम करू शकतात?'

जैन प्रमाणे, आयपीएलमधील एखाद्या संघाशी हितसंबंध असणारे माजी क्रिकेटपटू विश्वचषकात समालोचन कसे करु शकतात. त्यांनी अजूनही क्रिकेटमधून संन्यास घेतलेला नाही, मग ते टीव्ही एक्स्पर्टची भूमिका कशी पार पाडू शकतात. दरम्यान, बीसीसीआय आचारसंहिता अधिकारी यांनी सर्वोच्च न्यायालयाने मंजूर संविधानानुसार क्रिकेटपटूंना एका वेळी एकाच पदावर राहण्याचे आदेश दिले आहे. याचा अर्थ साचिन, सौरव आणि लक्ष्मण यांना आयपीएल, क्रिकेट व्यवस्थापन, कोचिंग किंवा समालोचना यांच्यात निवड करावी लागेल.

लोढा समिती (Lodha Committee) च्या नियमानुसार एका खेळाडूला एकच पद मिळू शकण्याचे स्पष्ट नमूद करण्यात आले आहे.