Canada vs Nepal 4th T20 Tri-Series 2024 Scorecard: चौथ्या T20 मध्ये कॅनडाने नेपाळचा 4 गडी राखून केला पराभव, साद बिन जफर ठरला हिरो

या सामन्यात कॅनडाने नेपाळचा ४ गडी राखून पराभव केला. तिरंगी मालिकेतील तीन सामन्यांमधला कॅनडाचा हा दुसरा विजय आहे. या सामन्यात कॅनडाकडून साद बिन जफरने चमकदार कामगिरी केली.

Canada vs Nepal 4th T20 Tri-Series 2024 Scorecard

Canada vs Nepal 4th T20 Tri-Series 2024 Scorecard: कॅनडा राष्ट्रीय क्रिकेट संघ विरुद्ध नेपाळ राष्ट्रीय क्रिकेट संघ यांच्यातील तिरंगी मालिकेतील पाचवा T20 सामना 01 ऑक्टोबर रोजी किंग सिटी येथील मॅपल लीफ नॉर्थ-वेस्ट मैदानावर खेळला गेला. या सामन्यात कॅनडाने नेपाळचा ४ गडी राखून पराभव केला. तिरंगी मालिकेतील तीन सामन्यांमधला कॅनडाचा हा दुसरा विजय आहे. या सामन्यात कॅनडाकडून साद बिन जफरने चमकदार कामगिरी केली. फलंदाजी करताना साद बिन जफरने 18 चेंडूत 33 धावा केल्या. याशिवाय गोलंदाजीतही त्याने 4 षटकात 13 धावा देऊन एक विकेट घेतली. ज्यासाठी त्याची सामनावीर म्हणून निवड करण्यात आली. दुसरीकडे, नेपाळचा तीन सामन्यांतील हा दुसरा पराभव ठरला. आता नेपाळ संघाचा शेवटचा सामना ओमानशी होणार आहे. हे देखील वाचा: Oman vs Nepal 5th T20 2024 Live Streaming: पाचव्या टी 20 मध्ये ओमान आणि नेपाळ यांच्यात होणार रोमांचक सामना; थेट प्रक्षेपण कधी, कुठे आणि कसा पहाल? घ्या जाणून

कॅनडाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना नेपाळने 6 गडी गमावून 139 धावा केल्या. नेपाळकडून अनिल शाहने 30 चेंडूत सर्वाधिक 41 धावा केल्या. आसिफ शेखने 30 चेंडूत 30 धावा, कर्णधार रोहित पौडेलने 6 चेंडूत 4 धावा, गुलसन झा याने 16 चेंडूत 23 धावा, कुशल भुरटेलने 15 चेंडूत 13 धावा केल्या. तर कॅनडाकडून हर्ष ठकारने 4 षटकात 17 धावा देत सर्वाधिक 2 विकेट घेतले. याशिवाय डिलन हेलिगरला 1 विकेट, अखिल कुमारलाने 1 विकेट आणि साद बिन जफरला 1 विकेट घेतला.

140 धावांचा पाठलाग करताना कॅनडाने 19.3 षटकांत 6 गडी गमावून लक्ष्य गाठले. कॅनडाकडून साद बिन जफरने सर्वाधिक ३३ धावा केल्या.

कर्णधार निकोलस किर्टनने 14 चेंडूत 26 धावा, दिलप्रीत बजवणेने 29 चेंडूत 25 धावा, रविंदरपाल सिंगने 21 चेंडूत 20 धावा आणि नवनीत धालीवालने 16 चेंडूत 12 धावा केल्या. तर नेपाळकडून ललित राजबंशी आणि संदीप लामिछाने यांनी प्रत्येकी २ गडी बाद केले. तर सोमपाल कामीने 1 विकेट घेतली.