US Revokes Sheikh Hasina's Visa: बांगलादेशातून हकालपट्टी केल्यानंतर अमेरिकेने रद्द केला शेख हसीना यांचा व्हिसा
या सगळ्यात अमेरिकेने शेख हसीना यांना मोठा धक्का दिला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अमेरिकेने शेख हसीना यांचा व्हिसा रद्द केला आहे.
US Revokes Sheikh Hasina's Visa: बांगलादेशातील प्रचंड निदर्शने आणि हिंसाचारानंतर शेख हसीना भारतात आल्या होत्या. सोमवारी त्यांनी पंतप्रधानपदाचा राजीनामा दिला. सध्या कडेकोट बंदोबस्तात हसीना भारतात अज्ञात ठिकाणी आहे. या सगळ्यात अमेरिकेने शेख हसीना यांना मोठा धक्का दिला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अमेरिकेने शेख हसीना यांचा व्हिसा रद्द केला आहे. म्हणजे हसीना यापुढे आश्रय घेण्यासाठी अमेरिकेत जाऊ शकणार नाहीत. बांगलादेशच्या स्थानिक वृत्तसंस्थेनुसार, ढाका येथील अमेरिकन दूतावासाच्या अधिकाऱ्याने सांगितले की, अमेरिकेच्या कायद्यानुसार व्हिसाचे रेकॉर्ड गोपनीय आहेत. म्हणून आम्ही वैयक्तिक व्हिसा प्रकरणांच्या तपशीलावर चर्चा करत नाही. मात्र शेख हसीना यांच्या पक्षातील अनेक सदस्य आणि अधिकाऱ्यांवर व्हिसा बंदी घालण्यात आली आहे. (वाचा - Bangladesh Violence: शेख हसीना यांच्या पक्षाच्या नेत्याच्या मालकीच्या Zabeer Hotel हिंसक जमावाने पेटवले; 25 जणांचा मृत्यू (Watch Video))
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)