Nepal Bus Accident: नेपाळमध्ये त्रशूली नदीत बस कोसळून भीषण अपघात, 8 प्रवासी ठार, 19 जखमी

गजुरी धबधब्याजवळ बस रस्त्यावरून घसरून त्रिशूली नदीत पडली.

Accident (PC - File Photo)

नेपाळमध्ये काठमांडूहून बेनीला जाणारी एक प्रवासी बस नेपाळच्या धाडिंग जिल्ह्यात आज त्रिशूली नदीत पडून 8 जण ठार तर 19 जण जखमी झाले. धाडिंगचे पोलीस प्रमुख एसपी गौतम मिश्रा म्हणाले, शोध मोहीम सुरू आहे. गजुरी धबधब्याजवळ बस रस्त्यावरून घसरून त्रिशूली नदीत पडली. गजुरी ग्रामीण नगरपालिकेच्या उपाध्यक्षा शर्मिला बिसुराल म्हणाल्या, बसचा अर्धा भाग पाण्यात बुडाला आहे.

पाहा पोस्ट -

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)