France on High Alert: पॅरिसमधील Louvre Museum आणि Palace of Versailles ला बॉम्बची धमकी; लोकांना त्वरित काढले बाहेर, हाय अलर्ट जारी
पॅरिसमधील लूवर संग्रहालय आणि पॅरिसच्या पश्चिमेस सुमारे 19 किलोमीटर अंतरावर व्हर्साय येथील पूर्वीचे शाही निवासस्थान, 'पॅलेस ऑफ व्हर्साय'ला लेखी धमकी मिळाली आहे.
फ्रान्समधील एका शाळेत पुन्हा एकदा दहशतवादी हल्ला झाला आहे. शुक्रवारी उत्तर फ्रान्समधील अरास शहरात एका 20 वर्षीय हल्लेखोराने एका शिक्षकाची चाकूने भोसकून हत्या केली आणि इतर काही शिक्षकांना जखमी केले. या घटनेचा राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी निषेध केला. गृहमंत्री गेराल्ड डरमॅनिन म्हणाले की, या घटनेनंतर फ्रान्स आता हाय अलर्टवर आहे.
दुसरीकडे, पॅरिसमधील लूवर संग्रहालय आणि पॅरिसच्या पश्चिमेस सुमारे 19 किलोमीटर अंतरावर व्हर्साय येथील पूर्वीचे शाही निवासस्थान, 'पॅलेस ऑफ व्हर्साय'ला लेखी धमकी मिळाली आहे. यानंतर संग्रहालयाने सर्व अभ्यागतांना आणि कर्मचार्यांना त्वरीत बाहेर काढले आणि आपले दरवाजे लवकर बंद केले. बॉम्बच्या धमकीनंतर शनिवारी पॅलेस ऑफ व्हर्सायदेखील रिकामा करण्यात आला. लूवर कम्युनिकेशन सेवेने सांगितले की, सध्या तरी कोणालाही दुखापत झाली नाही आणि कोणतीही अप्रिय घटना घडली नाही. पॅरिस पोलिसांनी सांगितले की, संग्रहालयात पडताळणी सुरू आहे. मोनालिसा सारख्या उत्कृष्ट कला नमुन्यांचे घर असलेल्या लूवरला दररोज 30,000 ते 40,000 लोक भेट देतात. (हेही वाचा: Israel-Hamas War: एका हातात इस्रायलमधून अपहरण केलेली मुलं, दुसऱ्या हातात रायफल; हमासच्या दहशतवाद्यांनी जारी केला व्हिडिओ)
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)