आयपीएल 2022 च्या 13व्या सामन्यात राजस्थान रॉयल्सचा सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूशी झाला. या सामन्यात राजस्थानला पराभवाला सामोरे जावे लागले.  राजस्थानचा हा पहिला पराभव आहे. त्याचबरोबर बंगळुरूचा या मोसमातील हा दुसरा विजय आहे. बंगळुरूने हा सामना 4 विकेटने जिंकला. हर्षल पटेलने शेवटच्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर षटकार ठोकत बंगळुरूला 4 विकेटने विजय मिळवून दिला. दिनेश कार्तिकने नाबाद 44 आणि हर्षल पटेलने 9 धावा केल्या. प्रथम फलंदाजी करताना राजस्थानने आरसीबीला 170 धावांचे लक्ष्य दिले होते, जे आरसीबीने 19.1 षटकांत 6 गडी गमावून पूर्ण केले. राजस्थानकडून युझवेंद्र चहल आणि ट्रेंट बोल्टने 2-2 तर नवदीप सैनीने एक विकेट घेतली.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)