Wimbledon 2022 Prize Money: विम्बल्डन बक्षीस रकमेत बंपर वाढ; ग्रँडस्लॅम विजेत्याला किती मिळणार बक्षीस रक्कम, जाणून घ्या
Wimbledon 2022 Prize Money: या वर्षीची विम्बल्डन चॅम्पियनशिप 27 जूनपासून सुरू होणार असून या वर्षीच्या चॅम्पियनशिपसाठी स्पर्धेच्या आयोजकांनी विक्रमी बक्षीस रक्कम जाहीर केली आहे. एकूण विम्बल्डन बक्षीस रक्कम £40.35 लाख या स्पर्धेसाठी सर्वकालीन उच्चांक आहे आणि गेल्या वर्षीच्या रकमेच्या तुलनेत यामध्ये 11.1 टक्के वाढ झाली आहे.
Wimbledon 2022 Prize Money: या वर्षीची विम्बल्डन चॅम्पियनशिप 27 जूनपासून सुरू होणार आहे, ज्यामध्ये जगातील काही सर्वोत्तम खेळाडू ग्रँडस्लॅम जिंकण्यासाठी हिरव्यागार गवतावर स्पर्धा करतील. या वर्षीच्या चॅम्पियनशिपसाठी स्पर्धेच्या आयोजकांनी विक्रमी बक्षीस रक्कम जाहीर केली आहे. महिला आणि पुरुष एकेरी टूर्नामेंटमधील विजेत्यांना £2,000,000 तर उपविजेत्याला £1,050,000 मिळतील. तसेच उपांत्य फेरीतील स्पर्धकांना प्रत्येकी £535,000 दिले जातात तर उपांत्यपूर्व फेरीतील स्पर्धकांना प्रत्येकी £310,000 मिळतील.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)