भारतीय पुरुष हॉकी संघाने सोमवारी चेन्नईच्या महापौर राधाकृष्णन स्टेडियमवर झालेल्या चौथ्या सामन्यात कोरियाचा पराभव करून आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफी 2023 च्या उपांत्य फेरीत आपले स्थान निश्चित केले. यासाठी राऊंड-रॉबिन सामन्यात भारतीय संघाने दक्षिण कोरियाचा 3-2 असा पराभव केला. भारताकडून नीलकांत शर्मा (6वे मिनिट), हरमनप्रीत सिंग (23वे मिनिट) आणि मनदीप सिंग (33वे मिनिट) यांनी गोल केले. कोरियाकडून किम सुंगह्यूनने 12 व्या मिनिटाला तर यांग जिहुनने 58 व्या मिनिटाला गोल केला. या विजयामुळे भारत चार सामन्यांत 10 गुणांसह अव्वल स्थानावर आहे. भारत बुधवारी आपला शेवटचा सामना कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानविरुद्ध खेळणार आहे. (हेही वाचा: Australia Cricket Team: आगामी विश्वचषकासाठी ऑस्ट्रेलियाचा 18 जणांच्या संघाची घोषणा, पॅट कमिन्स करणार नेतृत्व)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)