Anti-Sex Beds At Paris Olympics 2024: पॅरिसमध्ये 26 जुलै ते 11 ऑगस्ट दरम्यान ऑलिम्पिक खेळांचे आयोजन करण्यात येणार आहे. या मोठ्या टूर्नामेंटमध्ये सहभागी होणाऱ्या खेळाडूंबाबत मोठी बातमी समोर आली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये सहभागी होणाऱ्या खेळाडूंना ‘अँटी-सेक्स बेड्स’ देण्यात येणार आहेत. स्पर्धेदरम्यान खेळाडू कोणत्याही लैंगिक कृत्यांमध्ये सहभागी होऊ नये यासाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळाडूंना जे बेड मिळणार आहेत, त्यांचा आकार खूपच लहान आहे. फक्त एकच खेळाडू या बेडवर झोपू शकतो किंवा बसू शकतो. तसेच हे बेड दोन लोकांचे वजन पेलू शकणार नाही.

न्यूयॉर्क टाइम्सच्या वृत्तानुसार, पॅरिस ऑलिम्पिक सुरू होण्याआधीच अँटी-सेक्स बेड्स घटनास्थळी पोहोचले आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळाडूंना जे बेड दिले जातील ते एअरवेव्हने तयार केले आहेत. या कंपनीने टोकियो ऑलिम्पिक 2020 साठीही उत्पादने बनवली होती. (हेही वाचा: PVR Inox to Screen T20 Cricket: आता चित्रपटगृहांमध्ये पाहू शकाल टी-20 क्रिकेट विश्वचषक सामने; प्रेक्षकांना थिएटरमध्ये आणण्यासाठी 'पीव्हीआर आयनॉक्स'ची मोठी योजना)

पहा पोस्ट- 

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)