IPL 2022, GT vs RCB Match 43: गुजरात टायटन्सचा (Gujarat Titans) सलामीवीर शुभमन गिल (Shubman Gill) 28 चेंडूत 31 धावा करून पॅव्हिलियनमध्ये परतला आहे. त्याने आपल्या खेळीत 3 चौकार आणि 1 षटकार लगावला. शाहबाज अहमदच्या (Shahbaz Ahmad) ओव्हरमध्ये जोरदार ड्रामा पाहायला मिळाला. ओव्हरच्या चौथ्या चेंडूवर गिल विकेटच्या मागे झेलबाद झाला. पण गिलने रिव्ह्यू घेतला आणि रिप्लेमध्ये असे दिसून आले की चेंडू बॅटच्या कडेला लागलाच नाही. मात्र थर्ड पंचाने चेंडू नो बॉल दिला. कारण यष्टिरक्षकाचे ग्लोव्हज स्टंपच्या पुढे पोहोचले होते. गिलने फ्री हिटवर षटकार ठोकला. मात्र पुढी चेंडूवर माघारी परतला.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)