भारतीय क्रिकेट संघाचा वरिष्ठ क्रिकेटपटू विराट कोहली (Virat Kohli) याची फॅन फॉलोईंग जगभरात आहे. सध्या तो जगातील सर्वात प्रसिद्ध क्रिकेटपटू म्हणून ओळखला असे असताना सोशल मीडियावर देखील त्याला फॉलो करणारे करोडो लोक आहेत. आता यात सोशल मीडियाच्या माध्यमातून त्याने एक नवा पराक्रम केला आहे. अमेरिकेतील एका कंपनीने नुकताच अहवाल सादर केला. यामध्ये एका इंस्टाग्राम पोस्टसाठी सर्वाधिक मानधन घेणाऱ्या खेळाडूंची यादी जाहीर करण्यात आली. या यादीनुसार विराट एका पोस्टसाठी भारतीय रुपया तब्बल 11.45 कोटी रुपये आकारतो. हा आकडा इतर कोणत्याही भारतीय सेलिब्रिटींपेक्षा खूप अधिक आहे. तर, पोर्तुगालचा फुटबॉलपटू ख्रिस्टियानो रोनाल्डो (Cristiano Ronaldo) हा जगात इंस्टाग्रामवरून सर्वाधिक मानधन घेणारा खेळाडू ठरला आहे. तो एका पोस्टचे तब्बल 26.70 कोटी इतके पैसे घेतो. त्या पाठोपाठ अर्जंटीनाचा फुटबॉलपटू लिओनेल मेस्सी (Lionel Messi) 21.50 कोटी एका पोस्टसाठी मानधन घेताना दिसतो. यानंतर तिसऱ्या क्रमांकावर विराट कोहली आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)