South Africa Cricket: दक्षिण आफ्रिका क्रिकेट बोर्डाचा मोठा निर्णय, पुरुष संघाप्रमाणे महिला संघालाही मिळणार समान मानधन

भारतीय क्रिकेट बोर्ड, न्यूझीलंड क्रिकेट बोर्ड सध्या महिला संघाला पुरुष संघाप्रमाणे समान वेतन देण्याचे काम करत आहे. आता या यादीत दक्षिण आफ्रिकेचाही समावेश होणार आहे.

दक्षिण आफ्रिका क्रिकेट बोर्डाने (South Africa Cricket) महिला क्रिकेट संघासाठी मोठा निर्णय घेतला आहे. आता दक्षिण आफ्रिका क्रिकेट बोर्डही महिला खेळाडूंना पुरुष संघाप्रमाणे मानधन देणाऱ्या देशांच्या यादीत सामील होणार आहे. म्हणजे महिला संघातील खेळाडूंनाही पुरुष संघातील खेळाडूंना जेवढे वेतन मिळते तेवढेच मानधनही मिळेल. दक्षिण आफ्रिका क्रिकेट बोर्डाने ही घोषणा केली आहे. भारतीय क्रिकेट बोर्ड, न्यूझीलंड क्रिकेट बोर्ड सध्या महिला संघाला पुरुष संघाप्रमाणे समान वेतन देण्याचे काम करत आहे. आता या यादीत दक्षिण आफ्रिकेचाही समावेश होणार आहे. अशा स्थितीत हा महत्त्वाचा निर्णय मानला जात आहे. दक्षिण आफ्रिका क्रिकेट बोर्डाने मंगळवारी याची घोषणा केली.

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement