IND vs SL 2nd ODI: टीम इंडिया आणि श्रीलंका (IND vs SL) यांच्यातील सध्या सुरू असलेल्या तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना आज कोलकाता येथील ऐतिहासिक ईडन गार्डन्सवर खेळवला जात आहे. टीम इंडियाने गुवाहाटीमध्ये या मालिकेतील पहिला सामना जिंकून मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. आणखी एका विजयासह रोहित शर्माच्या संघाला मालिकेत अभेद्य आघाडी घेण्याची संधी आहे. श्रीलंकेसमोर करो या मरो अशी स्थिती आहे. तसेच श्रीलंकाने टाॅस जिंकून प्रथम फंलदांजी करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच गेल्या सामन्यात दुखापतग्रस्त झालेल्या युझवेंद्र चहलच्या जागी भारताने कुलदीप यादवचा समावेश केला आहे. या दरम्यान, प्रथम फंलदांजी करताना श्रीलंकेने भारतासमोर 216 धावांचे लक्ष्य ठेवले आहे. कुलदीप आणि सिराजने प्रत्येकी तीन बळी घेतले आहे.
2ND ODI. WICKET! 39.2: Dunith Wellalage 32(34) ct Axar Patel b Mohammed Siraj, Sri Lanka 215/9 https://t.co/MY3Wc5253b #INDvSL @mastercardindia
— BCCI (@BCCI) January 12, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)