RCB New Captain: फाफ डु प्लेसिस बनला रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरचा नवीन कर्णधार, लिलावात कोट्यवधी रुपयात केले खरेदी
RCB New Captain: रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर (RCB) फ्रँचायझीने अखेर त्यांच्या नवीन कर्णधाराच्या नावाची घोषणा केली आहे. आरसीबीने दक्षिण आफ्रिकेचा माजी कर्णधार फाफ डु प्लेसिस याला संघाचा नवा कर्णधार म्हणून नियुक्त केले आहे. डु प्लेसिसपूर्वी राहुल द्रविड, केविन पीटरसन, अनिल कुंबळे, डॅनियल व्हिटोरी, विराट कोहली आणि शेन वॉटसन यांनी देखील संघाचे नेतृत्व केले आहे.
RCB New Captain: रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर (Royal Challengers Bangalore) फ्रँचायझीने अखेर त्यांच्या नवीन कर्णधाराच्या नावाची घोषणा केली आहे. आरसीबीने (RCB) दक्षिण आफ्रिकेचा माजी कर्णधार फाफ डु प्लेसिस (Faf du Plessis) याला संघाचा नवा कर्णधार म्हणून नियुक्त केले आहे. तो विराट कोहलीची जागा घेणार आहे. तो यापूर्वी चेन्नई सुपर किंग्स कडून बरच काळ खेळला आहे. आरसीबीने डु प्लेसिसला आयपीएल लिलावात 7 कोटी रुपयात खरेदी केले होते.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)