IND vs SA ICC T20 World Cup 2024 Final: भारत आणि दक्षिण आफ्रिका (IND vs SA) यांच्यातील टी-20 विश्वचषकाचा अंतिम सामना (T20 World Cup 2024 Final) बार्बाडोसच्या केन्सिंग्टन ओव्हलवर सुरू झाला आहे. मेगा मॅचमध्ये टीम इंडियाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. या सामन्याच्या सुरुवातीचा एक क्षण चर्चेचा विषय बनला आहे. खरंतर नाणेफेकीदरम्यान असं काही घडलं की कर्णधार रोहित शर्मा हसायलाच लागला. टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा आणि दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार एडन मार्कराम टॉससाठी आले तेव्हा रवी शास्त्री उत्साहात दिसले. दोन्ही कर्णधारांची ओळख करून दिल्यानंतर त्यांनी सामनाधिकारी यांचीही ओळख करून दिली. या वेळी बॉक्सिंग रिंग असल्यासारखे वाटत होते. रवी इतका उत्साही दिसला की रोहित शर्मा हसला. रोहितची ही प्रतिक्रिया चर्चेचा विषय बनली आहे.
पाहा व्हिडिओ
View this post on Instagram
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)