नेपाळ संघाचा माजी कर्णधार आणि आयपीएल खेळाडू संदीप लामिछाने (Sandeep Lamichhane) याला काठमांडू विमानतळावर अटक करण्यात आली आहे. अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी त्याला नेपाळ पोलिसांनी अटक केली आहे. मात्र, त्याने यापूर्वीच आपल्या अधिकृत फेसबुक अकाउंटवरून आत्मसमर्पण केल्याचे सांगितले होते. संदीप लामिछाने याला गुरुवारी 6 ऑक्टोबर रोजी अटक करण्यात आली. सोशल मीडिया पोस्टद्वारे त्याने आपल्या चाहत्यांना सांगण्याचा प्रयत्न केला की तो पूर्णपणे निर्दोष आहे. दिल्ली कॅपिटल्सकडून आयपीएल खेळणाऱ्या संदीप लामिछानेने नुकतेच फेसबुक पोस्टमध्ये लिहिले की, तो निर्दोष आहे आणि कोणत्याही प्रकारच्या तपासासाठी पोलिसांना सहकार्य करेल. या संपूर्ण प्रकरणाच्या तपासादरम्यान आपले वकील सोबत ठेवण्याची परवानगीही त्यांनी मागितली होती.
Nepal | Former Nepali National team captain Sandeep Lamichhane, accused of raping a minor, arrested & taken into custody by police at Tribhuwan International Airport in Kathmandu https://t.co/IRkjcPPPvb pic.twitter.com/xF4f1LK0Ol
— ANI (@ANI) October 6, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)