Kieron Pollard Retirement: मुंबई इंडियन्सचा ‘तात्या’ किरॉन पोलार्ड याचा आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम, 15 वर्षात खेळले 224 सामने, एका ओव्हरमध्ये खेचले सहा ‘सिक्सर’

2007 मध्ये आंतरराष्ट्रीय पदार्पण करणाऱ्या पोलार्डने कारकिर्दीत एकूण 224 सामने आणि 2021 मध्ये श्रीलंकेविरुद्ध एका षटकात सहा षटकार मारले होते. भारताचा माजी अष्टपैलू खेळाडू युवराज सिंहनंतर आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये असा कारनामा करणारा तो दुसरा फलंदाज होता.

वेस्ट इंडिज कर्णधार कीरोन पोलार्ड (Photo Credit: Twitter/ICC)

Kieron Pollard Retirement: वेस्ट इंडिजचा (West Indies) मर्यादित षटकांचा कर्णधार किरॉन पोलार्डने (Kieron Pollard) आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. 2007 मध्ये आंतरराष्ट्रीय पदार्पण करणाऱ्या पोलार्डने कारकिर्दीत एकूण 224 आंतरराष्ट्रीय सामने खेळले. 33 वर्षीय पोलार्डचा शेवटचा सामना 20 फेब्रुवारी 2022 रोजी कोलकाता येथे भारताविरुद्ध (Team India) होता. पोलार्डने 2021 मध्ये श्रीलंकेविरुद्ध एका षटकात सहा षटकार मारले होते. त्याने अकिला धनंजयच्या षटकात सलग सहा सिक्सर ठोकले होते. भारताचा माजी अष्टपैलू खेळाडू युवराज सिंहनंतर टी20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये अशी कामगिरी करणारा पोलार्ड हा दुसरा फलंदाज होता.

 

View this post on Instagram

 

A post shared by Kieron Pollard (@kieron.pollard55)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)