IPL 2022 Mega Auction: देश-विदेशातील 590 खेळाडूंवर लागणार बोली, बेंगलोर येथे पार पडणार दोन दिवसीय आयपीएलचा मेगा लिलाव

12 आणि 13 फेब्रुवार रोजी बेंगलोर येथे होणार्‍या दोन दिवसीय मेगा लिलावात एकूण 590 क्रिकेटपटूंवर बोली लावली जाईल. लिलावासाठी नोंदणी केलेल्या 590 खेळाडूंपैकी 228 कॅप्ड खेळाडू, 355 अनकॅप्ड खेळाडू आणि 7 असोसिएट देशाचे सदस्य आहेत. आयपीएलच्या 15 व्या सीझनसाठी जागतिक क्रिकेटमधील काही दिग्गज लिलावात उतरले आहेत.

आयपीएल लिलाव 2021 (Photo Credit: Twitter/IPL)

इंडियन प्रीमियर लीगच्या (Indian Premier League) लिलावासाठी खेळाडूंची यादी जाहीर करण्यात आली आहे. 12 आणि 13 फेब्रुवार रोजी बेंगलोर (Bangalore) येथे होणार्‍या दोन दिवसीय मेगा लिलावात एकूण 590 क्रिकेटपटूंवर बोली लावली जाईल. लिलावासाठी एक हजारपेक्षा अधिक खेळाडूंनी नोंदणी केली असून 590 खेळाडूंना शॉर्ट-लिस्ट करण्यात आले आहे. लिलावासाठी नोंदणी केलेल्या 590 खेळाडूंपैकी 228 कॅप्ड खेळाडू, 355 अनकॅप्ड खेळाडू आणि 7 असोसिएट देशाचे सदस्य आहेत.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)