IPL 2022 Mega Auction: गेल्या काही काळापासून भारतीय संघातून बाहेर बसलेला ‘चायना-मॅन’ कुलदीप यादव आता दिल्ली कॅपिटल्ससाठी खेळणार आहे. कुलदीप यापूर्वी कोलकाता नाईट रायडर्स संघाचा भाग होता पण त्याला गेल्या वर्षी अधिक सामना खेळण्याची संधी मिळाली नाही. कुलदीप यादवला दिल्ली कॅपिटल्सने 2 कोटी रुपयांत आपल्या संघात समाविष्ट केले आहे. कुलदीपला विकत घेण्यासाठी पंजाब किंग्जने दिल्लीला जोरदार टक्कर दिली, पण विजय दिल्लीचा झाला.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)