भारत आणि ऑस्ट्रेलिया (IND vs AUS) यांच्यातील चार सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना नागपुरात खेळवला जात आहे. आज सामन्याचा दुसरा दिवस आहे. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात 177 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात भारताने पहिल्या दिवशी 1 गडी गमावून 77 धावा केल्या होत्या. पहिल्या सत्राचा खेळ दुसऱ्या दिवशीही सुरूच आहे. ऑस्ट्रेलियाकडून मार्नस लबुशेनने सर्वाधिक 49 धावांची खेळी केली. टीम इंडियाकडून रवींद्र जडेजाने सर्वाधिक 5 बळी घेतले. दरम्यान दुसरा दिवसाचा खेळ सुरु असुन भारताला सहावा मोठा धक्का बसला आहे. रोहित शर्मा 120 धावा करुन बाद झाला आहे. भारताचा स्कोर 240/6
Captain @ImRo45 departs a fine knock of 120.#TeamIndia 229/6, lead by 52 runs.
Live - https://t.co/edMqDi4dkU #INDvAUS @mastercardindia pic.twitter.com/fd73FrTz9U
— BCCI (@BCCI) February 10, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)