India Women's National Cricket Team vs New Zealand Women's National Cricket Team: महिला टी-20 विश्वचषक 2024 ला गुरुवारपासून सुरुवात झाली आहे. आज भारतीय महिला संघाचा पहिला सामना न्यूझीलंडविरुद्ध दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळवला जात आहे. (India Women's National Cricket Team vs New Zealand Women's National Cricket Team) हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाला टी-20 विश्वचषकाची सुरुवात विजयाने करायची आहे. तर न्यूझीलंड संघाचे नेतृत्व सोफी डिव्हाईन करत आहे. भारत आणि न्यूझीलंड यांच्यात होणारा सामना हा या स्पर्धेतील चौथा सामना आहे. टीम इंडियासोबतच न्यूझीलंडचाही हा स्पर्धेतील पहिला सामना आहे. दरम्यान, न्युझीलंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. प्रथम फलंदाजी करताना न्यूझीलंड महिला संघाला दुसरा धक्का लागला आहे. न्यूझीलंड महिला संघाचा स्कोर 68/2
T20WC 2024. WICKET! 8.1: Georgia Plimmer 34(23) ct Smriti Mandhana b Sobhana Asha, New Zealand (Women) 67/2 https://t.co/kEeUrD4MGu #INDvNZ #T20WorldCup #WomenInBlue
— BCCI Women (@BCCIWomen) October 4, 2024
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)