भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया (IND vs AUS) यांच्यातील चार सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना 9 फेब्रुवारीपासून नागपुरात (Nagpur) खेळवला जाईल. त्याचवेळी, या सामन्यापूर्वी टीम इंडिया नेट्समध्ये जोरदार सराव करत आहे. दरम्यान, सोशल मीडियावर एक व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. ज्यामध्ये भारतीय नेटचे गोलंदाज टीम इंडियाच्या फलंदाजांसमोर गोलंदाजी करत आहेत. त्याचबरोबर या सामन्यासाठी टीम इंडिया फिरकी गोलंदाजांविरुद्ध अधिक सराव करत आहे. कारण कसोटी क्रिकेटमध्ये फिरकीपटू महत्त्वाची भूमिका बजावतात. त्याचबरोबर भारताने काही फिरकी गोलंदाजांचा नेट गोलंदाज म्हणून समावेश केला आहे. जे सरावादरम्यान भारतीय फलंदाजांविरुद्ध गोलंदांजी करत आहे. नेट बॉलर म्हणून ज्या गोलंदाजांचा समावेश करण्यात आला आहे त्यांची नावे सौरभ कुमार, राहुल चहर, साई किशोर आहेत.

पहा व्हिडीओ

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)