India Beat Bangladesh: पहिल्या कसोटी सामन्यात भारताने बांगलादेशचा 188 धावांनी केला पराभव, मालिकेत 1-0 अशी घेतली आघाडी
शेवटच्या दिवशी भारताने बांगलादेशचा 188 धावांनी पराभव केला.
IND vs BAN 1st Test 2022: भारत आणि बांगलादेश यांच्यातील दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना चट्टोग्राम येथे खेळवला गेला. शेवटच्या दिवशी भारताने बांगलादेशचा 188 धावांनी पराभव केला. भारताने आता मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. या सामन्यात भारताकडून चेतेश्वर पुजारा, शुभमन गिल आणि कुलदीप यादव यांनी अप्रतिम कामगिरी केली. या मालिकेतील दुसरा सामना 22 डिसेंबरपासून सुरू होणार आहे. जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत पोहोचण्यासाठी भारताला हा सामना जिंकणे आवश्यक होते आणि या विजयासह भारताने कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीकडे एक पाऊल टाकले आहे. आता भारताला उरलेल्या पाचपैकी चार कसोटी जिंकायच्या आहेत.
1ST Test. India Won by 188 Run(s) https://t.co/CVZ44NpS5m #BANvIND
— BCCI (@BCCI) December 18, 2022
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Dec 18, 2022 09:59 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

